Husband wife dance video: पत्नी- पत्नीचे नातं कायमच वेगळे असते. जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते जर हेच नाते अतिशय प्रेमळ असेल तर संपूर्ण घर आनंदाने राहते. अर्थात नवरा-बायकोच्या नात्यांचा परिणाम संपूर्ण त्यांच्या आयुष्यावर आणि घरावर होत असतो. मात्र सध्या नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला समजेल.लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरूवात करतात. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांच्या सुख दु:खात कायम बरोबर राहतात. या नात्यात एक वेगळे प्रेम आणि जिव्हाळा पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या नवरा बायकोनं स्टेजवर मराठी चित्रपट ‘नवरी मिळे नवऱ्याला’मधील ‘ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, हिचा नखरा पाहून काळीज उडतंय, हो धक-धक, धक-धक’ या गाण्यावर डान्स केला आहे. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. या व्हिडिओमधल्या नवरा बायकोच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. ही महिला इतकी सुंदर नाचतेय, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय.
पाहा व्हिडीओ
आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ vaidehi0103 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय की, “हौस पूर्ण करण्यासाठी पैसा नाही तर, नवरा हौशी असावा लागतो” तर आणखी एकानं, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.