Husband – Wife Fight Video : पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे, कारण जिथे प्रेम आहे तिथे वाद होतातच. परंतु, कधी कधी या वादांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. काहीवेळा वादाचे रुपांतर इतक्या भयानक घटनेत होते की तुम्ही विचारही करू शकणार नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एका विवाहित जोडप्यात कोणत्या तरी घरगुती कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर इतके भयानक झाले की, पत्नीने थेट बोटीतून तलावात उडी मारली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, लोकसत्ता डॉट कॉम या व्हायरल व्हिडीओची पुष्टी करत नाही. पाषाण देवी मंदिराजवळ ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला नैनितालमधील तलावात बुडताना दिसत आहे. तेवढ्यात एका नाविकाची नजर त्या महिलेवर पडते आणि तो लगेच तिला वाचवायला जातो. तो बोट घेऊन त्या महिलेपर्यंत पोहोचतो आणि तिला वाचवतो. पण वेळीच जर तो नावीक तिथे पोहोचला नसता तर अघडीत घडलं असतं.

महिलेला तलावातून बाहेर काढल्यानंतर तिला बीडी पांडे रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

आत्महत्या करण्यासाठी महिलेने तलावात मारली उडी अन्

आत्महत्या करण्यासाठी महिलेने तलावात उडी घेतली. यानंतर ती बुडू लागली आणि आरडाओरडा करू लागली. यावेळी पर्यटकांना फिरायला घेऊन जाणाऱ्या नाविकाची नजर त्या महिलेवर पडली आणि त्याने लगेच बोट त्या महिलेच्या दिशेने वळवली. यानंतर त्याने महिलेचा हात धरून तिला बोटीवर ओढले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

“परिस्थितीपासून पळून जाऊ नये, ” युजरची कमेंट

@UttarakhandGo नावाच्या युजरने हे शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “परिस्थितीपासून पळून जाऊ नये, जीवनाचे मूल्य काय आहे हे तुम्हाला माहीत असेलच… मोठी दुर्घटना घडल्याशिवाय लोक शुद्धीवर येत नाहीत. पोलिसांनी तलावात उडी मारलेल्या महिलेवर तात्काळ कारवाई करावी.. तिचा जीव अनमोल आहे, ती आत्महत्या करू शकत नाही.

तर दुसऱ्याने म्हटले आहे की, तिचा पती नाविकाला कधीही माफ करणार नाही. लोकांना काय झाले आहे, की ते लहानसहान गोष्टींना कंटाळून असे जीव द्यायला जातात. या व्हिडीओवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला कमेंटमधून कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband wife fight video nainital woman jump in naini lake after fight with husband boat man save her video viral sjr