Husband wife funny video: नवरा-बायकोचे नाते खूप वेगळे असते. या नात्यामध्ये रूसवे, फुगवे, प्रेम आणि भांडणे नेहमीच होतात. त्यांच्यामध्ये जितके जास्त प्रेम असेल तितके अधिक भांडणे होतात. नवरा -बायकोशी संबंधित जोक्स, मीम्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.सध्या सोशल मीडियावर असाच एक नवरा-बायकोचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये बायको आपल्या नवऱ्याची शाळा घेत आहे. मालवणी भाषेतील नवरा बायकोचं हे संभाषण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

सोशल मीडियावर अनेक पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पती पत्नीच्या नात्यातील गोडवा दिसून येतो तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. आता तुम्ही म्हणाल बायकोनं नेमकी कसली शाळा घेतली? तर बायकोनं नवऱ्याची इंग्रजीची शाळा घेतली.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बायको स्पीकवेल इंग्लिश हे पुस्तक घेऊन नवऱ्यासमोर बसली आहे. यावेळी ती नवऱ्याला किती इंग्रजी येतंय हे तपासत आहे. अशातच बायको नवऱ्याला एक प्रश्न विचारते. कबुतराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? यावर नवऱ्याला काही उत्तर येत नाही. मग बायको नवऱ्याला वेगवेगळे क्ल्यू देते. ती म्हणते तुम्ही जो साबण वापरता त्याचं जे नाव आहे तेच कबुतराचं इंग्रजीमधलं नाव आहे. मात्र यावरही नवऱ्याला नेमका कोणता साबण हे आठवत नाहीये. त्यानंतर मात्र बायको तापते आणि तुझं करु तरी काय असं म्हणत मालवणी स्टाईलमध्ये नवऱ्याला ओरडते. तरीही नवरा वेगवेगळ्या साबणांची नाव घेऊन हेच उत्तर आहे का हेच उत्तर आहे का हे विचारतो मात्र त्याला काही योग्य उत्तर देता येत नाही.

मग वैतागलेली बायकोच अखेर कबुतराला इंग्रजीमध्ये काय बोलतात हे सांगते. बायको नवऱ्यावर ओरडते आणि सांगते “अरे डव म्हणतात डव. काय तू डव साबण माहिती नाही, टिव्हीवर बघतोस ना जाहिरात तरीही तुला माहिती नाही” अशाप्रकारे बायकोनं नवऱ्याची चांगलीच शाळा घेतली. कबुतराला इंग्रजीमध्ये पिजिन आणि रॉक डव असं म्हणतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नवरा भारी हौशी! हृदयी वसंत फुलताना गाण्यावर केला रोमँटिक डान्स; नवरीची रिअ‍ॅक्शन एकदा बघाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ saisushya नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, बायेक माझा डोक्या म्याड झाला. तर आणखी एकानं म्हंटलंय, “वह स्त्री है वह कुछ भी कर सकती है”