Viral video: नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ. कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुख:तही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नात आणखी टिकतं. माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. अशाच एका संघर्ष करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्षी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा बायको शेतातून बैलगाडीतून घरी जात आहेत. यावेळी बैलगाडीत वैरण भरलेलं आहे तर, बायको बैलांना सांभाळत आहे तर नवरा रस्त्यावरुन चालत बैलांना दिशा दाखवत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नव्या कोऱ्या बाईकला आग; तरुण गाडी बाजूला करायला गेला अन् २ सेकंदात झाला स्फोट, थरारक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ mpsc_short_notes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका यूजरने लिहिले की, “आयुष्याला इथेही साथ हवी…” दुसऱ्या यूजरने लिहिले, “जर प्रेम खरे असेल तर एक व्यक्ती तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकते.” “खरा जीवनसाथी मिळणे खूप महत्वाचे आहे.”

Story img Loader