Viral video: ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे…आता तुम्ही म्हणाल हे गाणं कशासाठी..तर याच गाण्याचा अर्थ सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच एका महिलेता व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संघर्षाचा आवाज तुम्ही कधी एकला नसेल मात्र हा व्हिडीओ पाहून संघर्षाचा आवाज कसा अन् किती मोठा असतो हे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला ऐरणीवर घाव घालत आहे. यावेळी ती अतिशय मेहनतीनं हे काम करताना दिसत आहे. तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल. या व्हिडीओतून संघर्षाचा आवाज किती मोठा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “माणसाच्या अस्तित्वाची लढाई असते. जगणार कसं याची लढाई .गरीब कष्टकरी माणूस जागतीकीकरणाविरुद्ध भांडत नाही तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करुन तो अस्तित्वाची लढाई लढत असतो. तो कोणाविरुद्ध लढत नाहीये तो स्वतःच्या अस्तित्वासाठी, जिवंत राहण्यासाठी झगडतो. तो त्याची कला, पत, संघर्ष, जागा सोडत नाही. आपण मात्र खूप लांब गेलो.” असा मजकूर लिहण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Year End 2023: ‘या’ मुलीचा व्हिडिओ २०२३ मध्ये सर्वाधिक पाहिला गेला; असं काय आहे या व्हिडीओत?

हा व्हिडीओ shubham kale1212 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. 