Husband Wife Video: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या सुख-दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार असला की सगळ्या संकटांना सामोरं जायला बळ मिळतं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूने प्रेम जर समान असेल तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.

प्रत्येक नातं जपायला थोडी अधिकची मेहनत घ्यावीच लागते. लहान-सहान गोष्टीने आपल्या त्या नात्याला फुलवणे गरजेचे असते. या नात्यात नवरा-बायकोचं नातं खूप पवित्र मानलं जातं. एकमेकांबद्दल प्रेम, तितकाच आदर आणि विश्वास असणारं नात हे असतं. प्रत्येक लहान सहान गोष्टींमध्ये कसा आनंद घ्यावा हे एकमेकांना कळलं की तो क्षण सार्थकी लागतो.

Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Wife husband's first priority
‘जेव्हा ती त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते…’ भरसाखरपुड्यात त्याने डोळ्यांच्या हावभावांनी व्यक्त केलं प्रेम; VIDEO पाहून म्हणाल, ‘पती असावा तर असा…’
Funny video of husband tshirt funny quote viral on alcohol husband wife funny reel
“प्रिय बायको तुझा विश्वास…”, बापरे! नवऱ्याने बायकोसाठी टी-शर्टच्या मागे काय लिहिलं पाहा; वाचून पोट धरून हसाल
husband dance with disabled wife
‘असे टिकते नाते!’ दिव्यांग पत्नीसाठी नवऱ्याने केला जबरदस्त डान्स! VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावरील येईल हसू
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

हेही वाचा… VIDEO: हे फक्त मराठी शाळेतंच घडू शकतं! पावडर घेतली, तोंडाला लावली अन्…, सरांचा शिकवण्याचा पॅटर्न पाहून तुम्हीही कराल कौतुक

बायकोची हौस पुरवणारे नवरे तुम्ही बघितले असतील, पण नवऱ्याची हौस पुरवणारी बायको तुम्ही क्वचितच बघितली असेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात बायको अक्षरश: नवऱ्याला खांद्यावर उचलून घेते आणि नाचू लागते.

बायको असावी तर अशी

नवरा बायकोचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका हळदीत नवरा बायको खूप धमाल करताना दिसत आहेत. एकमेकांची साथ देत गाण्यावर जबरदस्त ठेका धरताना दिसत आहेत. हळदीत नाचत असताना अचानक बायको नवऱ्याला उचलून खांद्यावर घेते आणि दोघंही नाचू लागतात.

सोशल मीडियावरील नवरा बायकोचा हा व्हिडीओ @dr_kamble94 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बस, एवढे नखरे झेलणारी पाहिजे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक

या व्हिडीओची चर्चा होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे लय भारी होतं.” तर दुसऱ्याने “एक नंबर जोडी भावा” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “नशीब लागतं भाऊ अशी बायको भेटायला”, “भाई मानलं पाहिजे वहिनीला, नवऱ्याचा आदर करणारी आहे, लॉयल कपल याला बोलतात”, अशीदेखील कमेंट एकाने केली.

Story img Loader