Cab Driver Playing PUBG Video : वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झालेल्या अपघाताचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंड लावून, वेळोवेळी कारवाई करून, आणि जागरुकता करूनही लोक बेपर्वाईने वाहन चालवतात. निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या अशाच एका चालकाचा व्हिडिओ समोर आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे कारण व्हिडीओमध्ये एक कॅब ड्रायव्हरने वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवताना चक्क PUBG हा ऑनलाइन मोबाईल गेम खेळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ शुट केला आहे. या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसरत करत असल्याचे दिसून येते आणि तो त्याच्या फोनमध्ये पूर्णपणे गुंतलेला दिसतो.

PUBG खेळत कार चालवतोय चालक

व्हिडिओमध्ये, तो दोन्ही हातांनी गेम खेळताना दिसतो. प्रवाशाने, त्यांच्या सुरक्षिततेची भीती बाळगून, गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त केली आहे, परंतु व्हिडिओच्या कॅप्शननुसार, ड्रायव्हरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गेम खेळणे सुरू ठेवले. व्हिडिओमध्ये एका फोनवर गुगल मॅप्स चालू असल्याचे आणि ड्रायव्हर दुसऱ्या स्मार्टफोनवर गेम खेळत असल्याचे देखील दिसून येते. चालकाला स्वत:च्या जीवाची पर्वा नाहीच पण प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या जीवाचींही पर्वा नाही.

व्हिडिओला आधीच दोन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. indianexpress.com स्वतंत्रपणे त्याची विश्वासार्हता पडताळू शकले नाही.

“एका रेडिट वापरकर्त्याने व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ड्रायव्हर एका हाताने स्टीअरिंग व्हीलवर आणि दुसऱ्या हाताने फोन धरलेला दिसतो,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

येथे पहा:

या व्हिडिओमुळे कॅब ड्रायव्हरने जीव धोक्यात घातल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने अधिकाऱ्यांकडे त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची किंवा त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. “परवाना रद्द करा/ड्रायव्हिंग करण्यापासून बंदी घाला,” असे वापरकर्त्याने लिहिले. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, “प्रवाशाने गाडीत बसून त्याचे व्हिडीओ करण्याचे धाडस कसे केले.”

“हे म्हणजे पुढच्या पातळीचे व्यसन,” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. “गाडीतून उतरून व्हिडिओ बनवण्याऐवजी त्याच्यावर तक्रार करा,” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.

फेब्रुवारीमध्ये, बेंगळुरूमध्ये एका महिलेला वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवताना लॅपटॉप वापरताना पाहिले गेले. दुसऱ्या वाहनातील एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला वर्दळीच्या रस्त्यावरून काम करत वाहन चालवताना दिसत तिचे लक्ष लॅपटॉपमध्ये असल्याचे दिसते व्हिडिओ लोकप्रिय झाल्यानंतर लगेचच, शहर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि महिलेला दंड ठोठावला.