Hyderabad woman’s lip chopped off by dentist: दातांसंबंधित कोणतीही समस्या असल्यास तुमच्यापैकी अनेक जण डेंटिस्टकडे जात असतील. यावेळी डेंटिस्ट तुमच्या दातांची समस्या जाणून घेत तुम्हाला एकतर औषधांनी बरी होईल की नाही ते सांगतो किंवा गरज असल्यास दात काढून टाकण्याचा सल्ला देतो. तुम्ही डेंटिस्टने आत्तापर्यंत दात काढल्याचे ऐकले असेल, पण दाताऐवजी कधी ओठ कापल्याचे ऐकले आहे का? हे वाचताना थोडं विचित्र वाटेल, पण बंगळुरूमधील एका महिलेबरोबर असाच भयंकर प्रकार घडला आहे. दातांच्या रुटीन चेकअपसाठी डेंटिस्टकडे गेलेल्या महिलेचा चक्क ओठ कापण्यात आला. इतकेच नाही तर याप्रकरणी तक्रार केल्यानंतर डॉक्टरने तिला हसत, आता अजून चांगली दिसतेयस असे म्हणून हिणवले. याहून धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे हे प्रकरण त्याच एफएमएस क्लिनिकमध्ये घडले, जिथे नुकतेच एका २८ वर्षांच्या तरुणाचा ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित सौम्या संगम नावाच्या एका युजरने एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात महिलेच्या खालच्या ओठाचा उजवा बाजूचा छोटा भाग गायब असल्याचे दिसतेय. सौम्याच्या मैत्रिणीबरोबर ही घटना घडली. सौम्याने लिहिले की, एका वर्षाहून अधिक काळ झाला, परंतु माझ्या मैत्रिणीचा ओठ अजूनही पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. ती अजूनही उघडपणे हसू शकत नाही. परिस्थिती अशी आहे की, तिच्या ओठांची लवचिकता परत आणण्यासाठी ती आता स्टिरॉइड्स घेत आहे.
शेतकऱ्याचा अनोखा जुगाड! जनावरांचे गवत हातांऐवजी चक्क पायांनी कापणे होणार शक्य; पाहा video
सौम्याने सांगितले की, ही घटना ज्युबली हिल्स येथील एफएमएस हॉस्पिटलमध्ये घडली आहे, जिथे नुकताच ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसजमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. तिने पुढे सांगितले की, जेव्हा पीडितेच्या आईने गूगलवर हॉस्पिटलबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली, तेव्हा डॉक्टरांनी तिला आश्वासन दिले की, त्यांच्या मुलीचा ओठ काही महिन्यांत बरा होईल, मात्र वर्षभरानंतरही डेंटिस्टच्या निष्काळजीपणाचे परिणाम तिला भोगावे लागत आहेत.
पीडित रुग्णाच्या आईच्या रिव्ह्यूनुसार, जेव्हा तिने आपल्या मुलीच्या उपचाराबद्दल रुग्णालयाच्या प्रभारींशी चर्चा केली, तेव्हा ती खूप चांगल दिसत असे म्हणत आहे म्हणत त्यांनी तिच्या वेदनांची चेष्टा केली आणि जोरजोरात हसले.
१६ फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या लक्ष्मी नारायण विंजम यांना ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेसाठी FMS इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ॲनेस्थेशियाच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.