Viral video: भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन नाही. अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. दरम्यान हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तीन चिमुकल्यांवर हल्ला करून चावा घेतल्याची ताजी घटना समोर आली आहे.याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैद्राबादमधील दिलसुखनगरमध्ये एका ५ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवला. कुत्र्याच्या या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालायं. अपार्टमेंटसमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने चिमुकल्याच्या शरिराचे लचके तोडले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यात भटके कुत्रे मुलावर हल्ला करताना आणि चावताना दिसत आहेत. दरम्यान, यावेळी मुले पळून घरात येताना एका मुलाचा कुत्र्यानं चावा घेतला यावेळी आवाज एकून घरातील एक सदस्य बाहेर आला त्यामुळे कुत्रे घाबरून पळून गेले.

A video of a leopard entering the garden of a house in Mount Abu
थेट घरात घुसला बिबट्या अन् बागेत फिरणाऱ्या कुत्र्यावर मारली झडप; थरारक घटनेचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना असे एकटे न सोडण्याचाही सल्ला दिला आहे.

पाह व्हिडीओ

हेही वाचा >> गर्भसंस्कार म्हणजे काय? एक वर्षाचं बाळ आईसोबत करतंय क्लासिकल डान्स; VIDEO पाहून व्हाल अवाक्

कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतं आहे. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करत आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. 

संपुर्ण देशात भटक्या कुत्र्यांची दहशत

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिसून आली आहे. नुकतेच गुजरात राज्यात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला होता. कुत्र्यांच्या या हल्ल्यात तीन वर्षांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पायी चालत जाणे किंवा सायकल चालविणाऱ्यांना हे कुत्रे आपले लक्ष्य बनवितात.