आपल्या नातवाला बाहेर खेळायला न सोडणे एका आजीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. आजी खेळायला बाहेर सोडत नाही त्यामुळे या नातवाने चक्क आजीच्या विरोधात पोलीस स्टोशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या छोट्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये पाहून पोलिसही चकित झाले शेवटी या मुलाची कशीबशी समजूत काढून पोलिसांनी त्याला घरी पाठवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : हत्येच्या आरोपाखाली तुरूंगवास भोगलेला ‘तो’ गुन्हेगार सीईओ होणार

हैदराबादमधल्या एसआरनगर पोलीस स्टेशनमध्ये एक छोटा मुलगा आपल्या आजीची तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचला. आपली आजी खेळायला बाहेर सोडत नाही तसेच आपल्यावर ओरडते अशी तक्रार या मुलाने पोलिस स्टेशनमध्ये केली. त्यामुळे मुलाच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा टीव्ही मालिका बघून या मुलाने असे काहीतरी केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी या मुलाला समजावून घरी पाठवले. इंडिया टुडेच्या माहितीनुसार येथल्या स्थानिक केबल ऑपरेटरचा हा मुलगा आहे. पोलिसांनी त्याला चॉकलेट्स देत आजीविरुद्धची तक्रार मागे घ्यायला सांगितली.

वाचा : ‘या’ गावाने देशाला दिले सर्वाधिक आयपीएस, आयएएस अधिकारी