एकीकडे प्रदुषणाच्या वाढत्या समस्या आहे तर दुसरीकडे खासगी वाहनांचा वापर वाढतो आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. आपण शाश्वत वाहतूकीच्या साधनांचा वापर करण्यासाठी आवश्यकता ज्यामुळे प्रदुषणनही होणार नाही आणि आपला प्रवाससही सुखकर होईल. सायकल हा एकच पर्याय असा आहे जो ही गरज पूर्ण करू शकतो. सायकलाचा वापर वाढवण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात. अनेक लोक असे आहेत जे सायकल वापरण्यासाठी इतरांना प्रेरणा देत असतात. प्रत्येकासाठी सायकल वापरणे हा पर्याय सोयीस्कर नसला तरी ज्यांना फारसे पैसे खर्च न करता, फार वेळ वाया न घालवता जवळच्या ठिकाणांवर प्रवास करायचा आहे अशा लोकांसाठी सायकल हा उत्तम पर्याय ठरतो. अशाच एका व्यक्तीला सायकलचा वापरण्यासा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
हैद्राबादमधील एका व्यक्तीने स्वयंपाक करणाऱ्या महिलेबद्दलची हृदयस्पर्शी गोष्ट सोशल मीडियावर सांगितली आहे. स्वयंपाक करणाऱ्या नीरजा ताईंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बिल्डींगच्या पार्किंगमध्ये नीरजा गुलाबी रंगाची सायकल चालवत आहे. सायकल चालवताना जो तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे खरंच मनाला भिडणारा आहे.
हैदराबादच्या सायकल महापौर ( Bicycle Mayor ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संथाना सेल्वन ( Santhana Selvan,) यांच्याकडून प्रेरणा घेत नरेश यांनी नीरजा यांना त्यांच्या दैनंदिन प्रवास चांगला होईल यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.
नीरजा या रोज एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत कामाला जाण्यासाठी रोज २५ मिनिटे चालतात, ज्यामध्ये त्यांचा रोज दीड-दोन तास जातात. त्यांचा हा प्रवास सुखकर बनवण्यासाठी नरेय त्यांना सायकलने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सेल्वन हे वाहतुकीचे शाश्वत साधन म्हणून सायकल चालवण्याला प्रेरणा देतात.
सुरुवातीला तिच्या शेजाऱ्यांकडून थट्टा होईल या भीतीने ती संकोच करत होती पण शेवटी निराजाने नीट विचार केल्यानंतर सायकल चालवण्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले. सायकल खरेदी करण्याससाठी नरेशने अर्धा खर्च उचलला आणि नीरजाने उर्वरित खर्च केला. निरजाने सुंदर गुलाबी रंगाची सायकल खरेदी केली. निरजाला सायकल घेतल्याचा खुप फायदा झाला नीरजाचा दैनंदिन प्रवासाचा वेळ प्रत्येक मार्गाने फक्त ५-७ मिनिटे इतका झाला होता. “
नरेशच्या पुढाकाराचे आणि निरजाच्या प्रयत्नांचे कौतूक केले जात आहे ज्यामुळे तिचे जीवन केवळ सोपे झाले नाही तर तिला अधिक टिकाऊ आणि कार्यक्षम वाहतुकीचा मार्ग स्वीकारण्यास सक्षम केले. निरजची हा व्हिडीओ ३४८ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. अनेकांना ही हा आवडली. काहींनी दोघांचेही प्रयत्नांसाठी कौतूक केले.