फोटोशूट हा आजकालच्या लग्नाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटोशिवाय लग्न करण्याचा कोणी विचारही करु शकणार नाही. लग्नातच नव्हे तर लग्न ठरल्यापासूनच फोटो काढायची नवी प्रथा आता उदयास आली आहे. ज्याला प्री-वेडिंग फोटोशूट असं म्हटलं जातं. जगभरात हे फोटोशूट मोठ्या हौसेने केलं जातं. आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर चांगले फोटो काढण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या आयडीया शोधत असतात, इतरांपेक्षा आपले फोटो खास असावेत यासाठी ते प्री-वेडिंग फोटोशूटचे वेगवेगळे प्लॅनही करतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. अशातच आता एका पोलीस जोडप्याच्या भन्नाट प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

व्हायरल व्हिडीओत पोलीस स्टेशन आणि पोलिसांची वाहने दिसत आहेत. फिल्मी स्टाईलमध्ये हे जोडपं एन्ट्री करताना दिसत आहे. तसेच यावेळी त्यांना इतर पोलीस त्यांना सॅल्युट करताना दिसत आहेत. सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. तर काही लोकांनी हे फोटोशूट अप्रतिम असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये फोटोशूट केलेलं जोडपे स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.

हेही पाहा- जुगाडू बाप! चिमुकल्याला बाईकवरुन फिरवण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला पोलिसांच्या गाडीतून एन्ट्री करते, यावेळी इतर लोक लोक तिला सलाम करतात. यानंतर तिचा भावी नवरा येतो. तोही अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही लोक व्हिडिओला लाईक करत आहेत, तर काहीजण याला अधिकारांचा गैरवापर असल्याचं म्हणत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकारी सीव्ही आनंद यांनी जोडप्याला सल्ला दिला आहे. व्हिडिओ रिट्विट करताना सीव्ही आनंद यांनी लिहिलं, “मी या व्हिडीओवरील संमिश्र प्रतिक्रिया पाहिल्या. ते त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे, परंतु थोडी लाजिरवाणी देखील आहे. विशेषत: महिलांसाठी पोलिसांचे काम खूप अवघड असते आणि त्याच विभागात जीवनसाथी मिळणे ही आनंदाची बाब आहे.

त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिलं की, गोष्ट अशी आहे की हे दोघेही पोलिस अधिकारी आहेत, मला पोलीस खात्याची मालमत्ता आणि चिन्हे वापरण्यात काहीही गैर वाटत नाही. जर त्यांनी आम्हाला याबाबतची आधी माहिती दिली असती तर आम्ही नक्कीच त्यांना शूटसाठी मान्यता दिली असती. आपल्यापैकी काहींना राग येत असेल, पण मला त्याला भेटून आशीर्वाद द्यायला आवडले असते. जरी त्याने मला त्याच्या लग्नाला बोलावले असते. मी इतरांना सल्ला देतो की परवानगीशिवाय अशी कृ्त्य करू नका. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण या जोडप्याकडून सिनेसृष्टीने काहीतरी शिकले पाहिजे, अशा कमेंट काही लोक करत आहेत. हा व्हिडिओ अनेक ठिकाणी शूट करण्यात आला आहे. ज्यामध्ये चारमिनारचाही समावेश आहे.

Story img Loader