Hyderabad Shocking video viral: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.हैदराबाद मध्ये मधापूर भागात एका बाईक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडर वर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं, कदाचीत हेच हेल्मेट जर घातलं असतं तर ते बचावले असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल हेल्मेट किती महत्त्वाचं आहे.

दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. त्यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडीओदेखील आहेत; ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. 

urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Milind Chandwani
Viral Video : पहाटे कॅब चालकाला झोप आवरेना, मग प्रवासीच बनला ड्रायव्हर; मिलिंद चंदवानी यांची पोस्ट चर्चेत
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
badlapur sexual assault case
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर पुन्हा हादरलं! मैत्रिणीने मद्य पाजले, मग रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य

नेमकं काय घडलं?

हैदराबादमधील माधापूर परिसरात झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. अय्यप्पा सोसायटी परिसरातील 100 फूट रुंद रस्त्यावर भरधाव वेगात बुलेट बाईक दुभाजकावर आदळल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रघु बाबू आणि आकाश हे दोघे तरुण बोराबांडा येथील रहिवासी असून या अपघातात जखमी झाले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरुण दुचाकीवरून हवेत उडाले आणि रस्त्यावर जाऊन आदळले. रघू बाबूचा जागीच मृत्यू झाला, तर आकाशचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! थेट जंगलाच्या राजासोबत भिडली म्हैस; या लढाईचा शेवट पाहून व्हाल शॉक

अपघाताचा हा थरार @iRe1th नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हैदराबादमध्ये भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू झाला.असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

Story img Loader