Hyderabad Shocking video viral: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.हैदराबाद मध्ये मधापूर भागात एका बाईक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडर वर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं, कदाचीत हेच हेल्मेट जर घातलं असतं तर ते बचावले असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल हेल्मेट किती महत्त्वाचं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा