गणपती बाप्पाला लाडू- मोदक खूप प्रिय असतात, असे मानले जाते. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान बाप्पाला अनेक भक्त आवडीने लाडू, मोदक अर्पण करतात. पण, हैदराबादमधील एका प्रसिद्ध मंडळातर्फे गणपती विसर्जनानंतर त्यासमोर ठेवलेला मोठा लाडू, मोदक प्रसाद म्हणून दिले जातात. पण हैदराबादमध्ये एका प्रसिद्ध गणेश पंडालमध्ये गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या लाडूचा दरवर्षी चक्क लिलाव केला जातो. गणेशोत्सवादरम्यान हैदराबादमधील प्रसिद्ध बाळापूरच्या पंडालमध्ये बाप्पासमोर ठेवलेल्या लाडूचा लिलाव होता. यंदाही हा लिलाव विक्रमीरित्या झाल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या गणेश पंडालमध्ये गणपती समोर ठेवलेल्या लाडूंना चक्क १.२५ कोटी रुपयांची बोली लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या लाडूंचा लिलाव झाला. ज्यात एक २१ किलोचा लाडू तब्बल २७ लाख रुपयांना विकला गेला. जो तुर्क्यमाजलच्या दासरी दयानंद रेड्डी यांनी विकत घेतला आहे.

या वर्षीच्या लिलावाची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन लाख रुपयांनी जास्त असल्याचे बोलले जात आहे. कारण- २०२२ मध्ये व्हीएलआर बिल्डर्सच्या व्हेंजेटी लक्ष्मा रेड्डी यांनी हा लाडू २४.६ लाख रुपयांना विकत घेतला होता.

गणपतीचा लाडू खरेदी केल्यानंतर दयानंद रेड्डी खूप आनंदी दिसले. यावेळी आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, गेल्या वेळी लिलावात दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने लाडू खरेदीचे भाग्य लाभले नाही; मात्र यावेळी बाप्पाने आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला आहे. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांना हा लाडू खरेदी करण्याचे भाग्य लाभले. हा लाडू ते त्यांच्या आई-वडिलांना भेट देणार आहेत. यावेळी सुमारे ३६ भाविकांनी या लाडूसाठी बोली लावली होती. बांदलागुडा येथील येथील प्रसिद्ध रिचमंड व्हिलामध्ये हा लिलाव झाला. ज्यात गणेश लाडूंसाठी १.२५ कोटी रुपयांची बोली लावली गेली यामुळे लाडूंच्या या लिलावाने एक नवा विक्रम रचला आहे.

दरवर्षी गणेशजींचे लाडू हैदराबादच्या बाळापूर गणेश मंडळामध्ये लिलावात ठेवले जातात. ही परंपरा २९ वर्षांपूर्वीपासून म्हणजे १९९४ पासून सुरू आहे. तुमचा विश्वास बसणार नाही की, जेव्हा पहिल्या लाडूचा लिलाव झाला, तेव्हा तो एक लाडू फक्त ४५० रुपयांना विकत घेण्यात आला होता. पण, २०२१ मध्ये गणेश लाडूंचा लिलाव १८.९ लाख रुपयांना झाला आणि २०२२ मध्ये २४.६ लाख रुपयांना झाला. त्यामुळे लिलावावर संपूर्ण देशाचे लक्ष होते.

दरवर्षी गणेशजींच्या लाडू-मोदकाचचा मोठ्या थाटामाटात लिलाव होतो. याबाबत देशभरातही उत्सुकतेचे वातावरण असते. लाडूची किंमत जाणून घेण्यातही अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळेच अनेक लोक लिलावात सहभागी होऊन लाखो रुपये खर्च करून गणपतीचा लाडू खरेदी करणयासाठी येतात. पण या लाडूचा लिलाव केल्यावर येणारा पैसा दानधर्मासाठी वापरला जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad sun city gated community auctions ganesh laddu prasadam record rs 125 crore sjr