मुलांना अभ्यास करायला अजिबात आवडत नाही. त्यांना जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं की ते अभ्यास न करण्याच्या पळवाटा शोधून काढतातच. मुलांना अभ्यासाला बसवणे फारच कठीण काम आहे. त्यातच आजकाल मुलांचा अभ्यास इतका वाढला आहे की अभ्यासात त्यांच्याबरोबरच पालकांनाही तेवढीच मेहनत घ्यावी लागते. यासाठीच मग मुलांना कोचिंग क्लासेसना पाठवले जाते. सध्या याचे प्रमाणही खूपच वाढले आहे. फक्त शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही आता कोचिंग क्लासेस सुरु झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशाच एका घरगुती क्लासमध्ये शिकणाऱ्या चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही लहान मुलगी अभ्यास करून खूपच वैतागली आहे. तिच्या शिक्षिकेने तिला वहीची तीन पाने भरून अभ्यास करण्यास सांगितलं होतं. पण तिला एवढा अभ्यास करण्याचा कंटाळा आला होता. तिची शिक्षिका तिला अभ्यास करण्यास सांगत होती, मात्र ही चिमुरडी मात्र तिला सतत नकार देत होती. या मुलीच्या बोबड्या स्वरातील हे संवाद नेटकऱ्यांना प्रचंड भावले आहेत.

“अरे बहुत जगह हैं”चं फीमेल व्हर्जन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

शिक्षिका या मुलीला वहीची तीन पाने भरून अभ्यास करण्यास सांगते. ती मुलीला म्हणते की इतर मुलं पाच-पाच पाने भरून अभ्यास करतात. त्यावर ही मुलगी म्हणते, “कंटाळा येतो गं मला अभ्यास करून.” या मुलीचं त्रासिक पण तितकंच लडिवाळ बोलणं सर्वांनाच आवडलं आहे. नेटकरी या व्हिडीओवर “किती गोड!” असं लिहून कमेंटही करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोमनाथ दादर्णे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून तो इतर प्लॅटफॉर्म्सवरही शेअर केला जात आहे. या मुलीचे गोंडस बोल सगळ्यांनाच खूप आवडले आहेत. या मुलीच्या बोबड्या बोलाचे कौतुक करत नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शन भरून टाकला आहे.