Martyr Humayun Father Emotional Memories: सप्टेंबर २०२३ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत १९ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट्ट हे शहीद झाले होते. यापैकी शहीद भट्ट यांचे वडील हे स्वतः निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. भट्ट यांच्या मृत्यूच्या आठ महिन्यांनी त्यांचे वडील म्हणजेच जम्मू व काश्मीरचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) गुलाम हसन भट्ट यांनी लेकासह झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण सांगितली आहे. गोळीबार झाल्यावर शेवटचे काही श्वास घेताना वडिलांना माहिती देण्यासाठी केलेल्या त्या शेवटच्या कॉलमध्ये हुमायून यांच्या आवाजातील शांतता व त्यांनी उद्गारलेले शब्द हे काळजाला चिरून जातील असे आहेत. १३ सप्टेंबर २०२३ ला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी आलेल्या त्या १३ सेकंदाच्या कॉलमध्ये हुमायून यांनी वडिलांना नेमकं काय सांगितलं हे वाचून तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील.

“माझ्या वाट्याला काय येणार आहे हे मला माहित होतं, पण.. “

हुमायून यांचे वडील गुलाम हसन भट्ट यांनी लेकासह केलेल्या त्या शेवटच्या संभाषणाविषयी सांगताना म्हटले की, “बाबा, मला पोटात गोळी लागली आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका.” असं सांगणारा तो कॉल आमचं आयुष्य बदलून गेला. त्याच्या दोन वाक्यांमध्ये तो काही क्षण थांबला होता तो सेकंद मी विसरूच शकणार नाही. मी जेव्हा माझा नातू अशरला रांगताना पाहतो तेव्हा मला माझा हुमायूनच आठवतो. खूप लहान वयातच अशरच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, कदाचित आपले वडील कोण होते हे त्याला कधी कळणारच नाही. पुढच्या महिन्यात अशरचा पहिला वाढदिवस आहे हुमायूनला यातलं काहीच पाहता येणार नाही याचं दुःख खूप मोठं आहे.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

३४ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये ड्युटी केलेले निवृत्त पोलीस महानिरीक्षक गुलाम हसन भट्ट पुढे सांगतात की, “आता बोलताना हे सोपं वाटेल पण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण होता. श्रीनगरच्या ९२ बेस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत नेमकं काय घडतंय, घडणार आहे, हेच कळत नव्हतं. तिथे मी माझ्या जखमी मुलाची वाट पाहात होतो. मी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो तेवढ्यात साधारण ३.३० वाजता पुन्हा एक कॉल आला, मी पुरता घाबरलो होतो. मध्यरात्री ३.३० ला दक्षिण रेंजच्या डीआयजीने मला एका तात्पुरत्या स्ट्रेचरवर हुमायूनला डोंगरावरून खाली आणलेला फोटो पाठवला. तिथून पुन्हा पुढे १०० किमी दूर असलेल्या श्रीनगरच्या रुग्णालयात हुमायूनला आणण्यासाठी काही तास लागले. माझ्या पत्नीसह हॉस्पिटलच्या त्या व्हरांड्यात चालतानाचा क्षण खूप वेदनादायक आणि मोठा वाटत होता. वेळ आणि ते अंतर संपतच नाहीये असं वाटत होतं. “

डोळ्यातून अश्रूच्या धारा ओघळताना भट्ट पुढे म्हणाले की, “माझ्या वाट्याला काय येणार आहे हे मला माहित होतं पण काही केल्या त्याच्या उलट काहीतरी घडावं, माझा हुमायून माझ्याशी बोलत माझ्यासमोर यावा यासाठी मन प्रार्थना करत होतं.”

हुमायूनचा बायकोच्या फोनवरचा तो शेवटचा मेसेज

आता आठ महिन्यांनी भट्ट कुटुंब या दुःखातून सावरतंय. लेकाला गमावल्याचं मोठं दुःख आहेच पण हिमतीने, त्यागाने लेकाने देशासाठी प्राण त्याग केला याचा सार्थ अभिमान या कुटुंबाच्या मनात आहे. भट्ट व त्यांची पत्नी आता दर आठवड्याला आपला नातू अशर व सुन फातिमाला भेटण्यासाठी वाट पाहत असतात. फातिमा या काश्मीर विद्यापीठात कार्यरत आहेत, कार्यालयापासून जवळच फातिमा व अशर हे दोघे राहतात. भट्ट सांगतात की, “हुमायूनच्या मृत्यूनंतर फातिमा नैराश्यात होती. या घरातील प्रत्येक गोष्ट तिला तिच्या नवऱ्याची आठवण करून देणारी होती. ती कितीतरी तास त्या दोघांचे जुने मेसेज वाचत राहायची, मला तिचा फोनही काढून घ्यावा लागला. तिच्या फोनमध्ये हुमायूनचा शेवटचा मेसेज होता की, “मला माफ कर, अशरची काळजी घे.”

हुमायून होता आईचा लाडका

हुमायून बँक परीक्षा आणि नंतर राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन समाजकल्याण अधिकारी म्हणून रुजू झाले होते. २०१८ मध्ये काश्मीर पोलिस सेवेत निवड झाल्यानंतर ते पोलिस दलात दाखल झाले. गुलाम भट्ट सांगतात की , “त्याला पोलिस दलाची आवड होती, कदाचित तो मला पाहून मोठा झाला होता म्हणून असावं. हुमायून निश्चितपणे प्रत्येक पालकांचं स्वप्नवत मूल होते. तो माझ्याशी कधीही वाद घालायचा नाही पण त्याचं त्याची आई हलीमाशी खूप जमायचं.”

तो माझा भाऊ नाही, मित्रच..

दुसरीकडे, हुमायूनचा भाऊ डॉ. हनान, एक पशुवैद्य आहे. भट्ट यांच्या घराजवळ १५० मीटरवर हुमायूनवर अंत्यसंस्कार झाले होते, आजही हनान अनेकदा आपल्या भावाच्या कबरीला भेट देतो, त्यांच्या आठवणी आठवतो, भावाचा सहवास मिळवता येईल असा प्रयत्न करतो. हनानने टाइम्स नाऊशी बोलताना सांगितले की, “मी जेव्हा त्याच्या कबरीजवळ बसतो तेव्हा मला खूप समाधान मिळतं. मी माझ्या तक्रारी त्याला सांगतो, भावाशी सगळं शेअर करतो. शेवटी तो फक्त माझा मोठा भाऊच नव्हता तर जवळचा मित्र होता. “

हे ही वाचा << १२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!

कसा झाला होता हुमायूनचा यांचा अंत?

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सुरक्षा दलांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडूल गावाच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात कट्टर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहिती मिळाली होती. १२ आणि १३ सप्टेंबर २०२३ च्या मध्यरात्री दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. धोका ओळखून दहशतवाद्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात जवानांवर गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होऊन त्यात हुमायून, कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि शिपाई परदीप सिंग यांना गोळ्या लागल्या व हे वीरजवान शहीद झाले.