डिलव्हरी अॅपचा वापर गेल्या काही वर्षांपासून खूप वाढला आहे. घरबसल्या सर्वकाही मागवता येत असल्यामुळे आपले जीवन अत्यंत सुलभ झाले आहे. त्यामुळे सर्वांचा वेळ वाचतो. अॅपद्वारे मागवलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकताच सोशल मीडियावर झोमॅटोवरून मागवलेल्या चिकन न्युडल्समध्ये झुरळ सापडले. या व्हिडीओची चर्चा सुरू असताना आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्तीने संत्र्याचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये एक जिंवत अळी दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना व्यक्तीने सांगितले की त्याने हे संत्री झेप्टो या अॅपवरून मागवले होते.
एका व्यक्तीने दावा केला की, त्याने झेप्टोकडून खरेदी केलेल्या संत्र्यांपैकी एकामध्ये एक अळी दिसत आहे. त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो १५फेब्रुवारी रोजी X वर पोस्ट केला. X वर पोस्ट केल्यानंतर, Zepto ने व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची माफी मागितली आणि त्याला पैसे देखील परत केले.
“मी झेप्टो वरून संत्री मागवली आणि मला मिळालेल्या एका संत्र्यामध्ये एक जिवंत अळी सापडली,” असे व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते.
तसेच या व्यक्तीने या समस्येबद्दल Zepto ॲपवर तक्रार करण्यास अक्षम आहे असेही सांगितले.
“मला झेप्टोच्या सोशल मीडिया ॲडमिनचा कॉल आला. त्यांनी या समस्येबद्दल माफी मागितली आणि पैसे परत केले. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खात्री त्यांनी मला दिली. अशाच प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी ते स्टोअरच्या सुरक्षा उपायांची चौकशी करतील असेही त्यांनी नमूद केले,” असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.
हेही वाचा – पुण्यातील व्यक्तीला वॉटर प्युरिफायरमध्ये सापडल्या ‘लाल अळ्या’, व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले पुणेकर
त्यांच्या पोस्टमध्ये, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली आणि झेप्टोच्या जलद प्रतिसादाबद्दल आभार मानले.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यापासून शेकडो लोकांनी पाहिली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्टच्या कमेंटमध्ये त्यांचे विचार व्यक्त केले आहे.
खरं तर, झेप्टोनेही त्या व्यक्तीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती.
गेल्या आठवडाभरात, अशाच प्रकारच्या अनेक प्रकरणांची चर्चा होत आहे, जिथे लोकांना त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये जिवंत अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी इंडिगोच्या एका प्रवाशाने दावा केला होता की, त्याला त्याच्या फ्लाइटमध्ये सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये स्क्रू सापडला होता. १२ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथील रॉबिन जॅक्युस नावाच्या व्यक्तीला त्याच्या कॅडबरी चॉकलेट बारमध्ये एक अळी सापडली होती.