इन्फोसिसचे सह-संस्थापक NR नारायण मूर्ती यांनी ७० तासांच्या वर्क वीकवर आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे, असे सांगून की त्यांचा ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ या संकल्पनेवर विश्वास नाही. १९८६ मध्ये भारताने सहा दिवसांच्या वर्क वीकवरून पाच दिवसांच्या वर्क वीकमध्ये बदल केल्याबद्दलही त्यांनी निराशा व्यक्त केली. “माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही,” असे मूर्ती म्हणाले.
भारतीयांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे- मूर्ती
CNBC-TV18 ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये बोलताना, मूर्ती पुढे म्हणाले की,”भारताच्या आर्थिक वाढीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी भारतीयांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे.
हेही वाचा –फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
भारत हा गरीब देश आहे… ; मूर्ती
“सुमारे २५ वर्षांपूर्वी, केव्ही कामथ यांना एका कार्यक्रमात वर्क-लाइफ बॅलन्सबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले होते. ते म्हणाले की,”भारत हा गरीब देश आहे ज्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. आपल्याला प्रथम जीवन निर्माण करावे मिळावे लागेल, त्यानंतर आपण काम – आयुष्य यांच्यातील संतुलनाची काळजी करू शकतो,” असे मूर्ती म्हणाले. कामथ हे Jio Financial Services चे चेअरमन आहेत.
७०-तासांच्या वर्क वीकबद्दल काय म्हणाले मूर्ती?
ते पुढे म्हणाले की “भारताला अधिक मजबूत कार्य नीतिमत्तेची गरज आहे” आणि “७०-तासांच्या वर्क वीक” बद्दल त्यांचे मत अपरिवर्तित(बदलू शकत नाही) आहे याची पुष्टी केली. “मला माफ करा, मी माझा दृष्टिकोन बदललेला नाही. मी हे माझ्या मतावर शेवटच्या श्वासापर्यंत ठाम राहील,” असेही ते म्हणाले
हेही वाचा – लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
“पंतप्रधान मोदी आठवड्यातून १०० तास काम करतात
“पंतप्रधान (नरेंद्र) मोदी कदाचित आठवड्यातून १०० तास काम करतात. जेव्हा त्यांचे कॅबिनेट मंत्री खूप कठोर परिश्रम करत असतात, जेव्हा त्यांचे सर्व नोकरशहा खूप कठोर परिश्रम करत असतात, तेव्हा या सर्व आश्चर्यकारक गोष्टींबद्दल कौतुक करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले काम हाच आहे. ” असे मूर्ती पुढे म्हणाले.
“भारताची प्रगती नागरिकांच्या त्याग करण्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. कठोर परिश्रम हे केवळ वैयक्तिक मूल्यांपेक्षा एक कर्तव्य म्हणून पाहतात, विशेषत: ज्यांना भारताच्या सार्वजनिकरित्या अनुदानीत शिक्षण प्रणालीचा( publicly-funded education system फायदा झाला आहे त्यांच्यासाठी.” असे मूर्ती यांचे मत आहे