Viral video: आज २५ डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा केला जातो. ख्रिसमस सोबत आता नवीन वर्षाची देखील सुरुवात होत आहे. २०२४ हे वर्ष संपून नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले आहेत. दरम्यान या सगळ्यात दरवर्षी सोशल मीडियावर सिक्रेट सँटा किंवा ख्रिसमस आलं की, एका विषयावर जोरदार चर्चा होते. तो विषय म्हणजे हिंदुंना आपल्या वासुदेवाचा विसर पडला. सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा, टीका, ट्रोलिंग असं सुरु असतं. याच पार्श्वभूमीवर वासुदेवाच्या हातातील पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातून वासुदेव हरवत गेला आहे. आधीच्या काळी सकाळची सुरुवात वासुदेवाच्या गाण्याने होत असतं. मात्र आता अनेक मुलांना वासुदेव म्हणजे हे कोण माहिती नसते, पंरतू सोशल मीडियावर वासुदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यानं हातात एक पाटी घेऊन भर रस्त्यात उभा राहिला आहे. यावेळी या पाटीवरचा मेसेज वाचून सगळेच थांबू लागले आहेत.
आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर वासुदेवाच्या हातातील या पाटीवर “सांताक्लोज मलाही आवडतो तो नक्कीच आपल्या मुलांना दाखवा..पण त्यासोबतच हरवत चाललेला आपला वासुदेवही एकदा आठवा” अशा प्रकारचा मेसेज लिहला आहे. आपली संस्कृती आपली जबाबदारी अशा प्रकारचा मेसेज थोडक्यात यातून देण्यात आला आहे. यावेळी ही पाटी वाचून बरेच लोक थांबत आहेत तसेच हो बरोबर अशा प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
वासुदेव कोण आहे?
हिंदू संस्कृतीमध्ये वासुदेवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे. कायम आपल्या गीतातून तत्त्वज्ञान सांगितले जाते. चांगले काम करावे आणि चांगल्या वाईट अनुभवाचीची शिदोरी परमेश्वरावर सोपवावी हा दृष्टीकोन वासुदेव देतात.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ _sahil_0919 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सांताक्लॉज च्या नादात आमचा वासुदेव हरवला कधीकाळी वासुदेव पाहणारी कदाचित आमची शेवटची पिढी. अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे.