आपल्याच लग्नात वेगवेगळ्या थीमवर किंवा गाण्यांवर डान्स केलेल्या जोडप्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यातले काही हटके व्हिडिओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे, जो पाहिल्यावर तुमचेही पाय या गाण्यावर थिरकले नाही तर नवल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशियन पर्यटकावर आली मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ, सुषमा स्वराज आल्या मदतीसाठी धावून

वर्षभरापूर्वी रॅपर रिनोश जॉर्ज यांचं ‘आय एम मल्लू’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं लोकांना इतकं आवडलं की दक्षिणेकडच्या अनेक जोडप्यांनी हे गाणं सिनेमॅटोग्राफीसाठी निवडलं. नववधु अश्वथी वारियर आणि नवरदेव अभिषेक उन्नीकृष्णन यांनीदेखील ‘आय एम मल्लू’ गाण्याची वेडिंग अँथम म्हणून निवड केली. अर्थात गाण्याचे बोल आणि त्यावर नवविवाहित जोडप्याचा दमदार अभिनय यांमुळे लग्नातला हा व्हिडिओ अनेकांना आवडला. अश्वथी आणि अभिषेकच्या कुटुंबियांनीही त्यांना चांगलीच साथ दिली. अश्वथीने तमिळ चित्रपटात काम केलं आहे. आठवड्याभरात तिच्या लग्नाचा व्हिडिओ २ लाख २६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
विशेष म्हणजे अश्वथीच्या भावाने नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गेल्याच आठवड्यात तिचा विवाहसोहळा पार पडला.

एक युक्ती; १६६ फोन आणि अॅमेझॉनला त्याने घातला लाखोंचा गंडा