आताच्या तारुण्य वयात जरा बालपणात वळून बघितले असता आपण बऱ्याच वर्षाचा काळ लोटून पुढे आलो आहोत असे वाटते. सध्याच्या मुलांचे बालपण बघता हवे तसे बालपण सध्याच्या मुलांना जगायला मिळत नाही किंबहुना बालपण अनुभवयास मिळत नाही असे निदर्शनास येते. काय दिवस ते बालपणातील …… विसरू ही शकत नाही. ते बाल्यावस्थेतील जीवन म्हणजे आजही मनावर कोरलेले शिल्प अथवा एक कधीही संपुष्टात न येणारा जबूत खजिनाच जणू. ते दिवस आठवले की पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. सध्याची मुले बालपण म्हणजे काय हेच विसरून गेलेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण ही जगतातील परिस्थिती अशी असताना मुलांचे बालपण हरवले असताना सुद्धा आज प्रत्येकात एक लहान मूल दडलेले असते. आणि प्रत्येकाला वाटत असत की आपण पुन्हा एकदा लहान व्हावं. कारण लहानपणात जी मजा आहे ती मोठेपणात नाही. लहानपणी जो खोडकरपणा, मस्तीखोरपणा अंगी मुरलेला असतो तो इतरत्र वावरताना दिसतोच दिसतो. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण नक्की आठवेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – मुंबईकरांची ऑफिसला पोहचण्यासाठी भंयकर कसरत! मुंबई लोकलचं सत्य समोर आणणार Video viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी आठवत आहेत .लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।