विराट कोहलीने आपल्या ३५व्या वाढदिवसाच्या दिवशी आंतराष्ट्रीय एक दिवसीय कारकिर्दीतील ४९ वं शतक पूर्ण केलं. एवढचं नव्हे तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरीदेखील केली आहे. विराट कोहलीचे सर्वत्र कौतूक होत आहे. पण त्याच दिवशी त्या सामान्यात फक्त कोहलीचा रेकॉर्डच नव्हे तर आणि एका तरुणीचं बॉयफ्रेंडबरोबरील प्रेमाचं नातं तुटलं. कोहलीच्या शतकपूर्तीसह एका जोडप्याचे ब्रेकअप झाल्याची घटना समोर आली आहे. याचे कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एक पोस्टर. एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणीच्या हातातील पोस्टरवर असे काही लिहिले आहे ज्यामुळे कोहलीचं शतक पूर्ण होताच तिचे ब्रेकअप झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीच्या शतकामुळे तरुणीचं झालं ब्रेकअप

हा व्हिडीओ कोलकत्यातील ईडन गार्डन्स स्टेडीयममधील आहे जिथे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पार पडला. व्हिडीओमध्ये दिसते आहे की,”भारतीय प्रेक्षकांमध्ये बसलेल्या तरुणीच्या हातात एक पोस्टर आहे ज्यावर लिहिले आहे की, “जर कोहलीने १०० रन पूर्ण केले तर मी ब्रेकअप करेन.” एकीकडे कोहलीच्या चाहत्यांना कोहलीचे शतक केव्हा पूर्ण होईल याची आशा लागली होती तर दुसरीकडे या तरुणीला आणि तिच्या मित्रांना तिचे ब्रेकअप होईल का याचे टेन्शन आले होते. जसे कोहलीचे शतक पूर्ण होते त्यानंतर सर्वजण उत्साहात जल्लोष करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “किंग कोहलीला कमी लेखू नका! आता अदितीला नवीन कोणीतरी शोधावे लागेल.”

हेही वाचा – “विराट कोहलीने १०० धावा करणं भारताला त्रासदायक..”, गौतम गंभीरने पुन्हा केलं लक्ष्य, म्हणाला, “श्रेयसलाच उलट..

तरुणीच्या हातातील पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी बांधले अंदाज

तरुणीने असे विचित्र ब्रेकअप का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही लोकांनी अंदाज बांधला की, “या तरुणीला कदाचित ब्रेकअप करायचेच होते तर काही लोकांनी असाही अंदाज व्यक्त केला की,” कोहली शतक पूर्ण करणार नाही आणि तिला ब्रेकअपही करावे लागणार नाही असा समज तरुणीचा झाला असावा. हे सर्व फक्त अंदाज आहेत, तरुणीच्या अशा विचित्र ब्रेकअपचे खरे कारण काहीही असो पण सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओवर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

हेही वाचा – कटरने सिलेंडर कापताच झाला नाही स्फोट तर पडला चक्क पैशांचा पाऊस; पाहा Viral Video

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “कोहलीने एका निष्पाप मुलाला वाचवले” तर दुसऱ्याने लिहिले की, कदाचित ती चुकीच्या नात्यात असेल आणि ब्रेकअप करण्यासाठी काहीतरी कारण शोधत असेल” तिसऱ्याने लिहिले, “विराट फक्त रेकार्ड नव्हे तर लोकांची नातेही तोडत आहे.” चौथ्याने लिहिले की,”टॉक्सिक रिलशनशिपमधून बाहेर पडण्याचे कारण.”तर पाचवा म्हणतो, ठआता माझ्या लक्षात आलां की लोक विराटचा एवढा तिरस्कार का करतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will break up if virat score 100 girl holding poster in india vs south africa world cup 2023 video goes viral snk