Gajanand Yadav IAF Fighter Hoisted G-20 Flag Video Viral : दिल्लीत जी-२० समूहाची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या परिषदेत ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि अधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. विदेशातून आलेल्या पाहूण्यांचं स्वागत करण्यासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वायुसेनेच्या एका विंग कमांडरचा व्हिडीओही इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. जी-२० ला अविस्मरणीय बनवण्यासाठी भारतीय वायुसनेचे विंग कमांडर गजेंदर यादव यांनी तब्बल १० हजार फूट उंचीवर स्कायडायविंग केली आणि जी-२० चा झेंडा फडकवला. आकाशातील हा थरारक व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@SWAC_IAF या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, जी-२० शिखर परिषद सुरु होण्यासाठी आता थोड्या दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या परिषदेला आणखी सुंदर बनवण्यासाठी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर गजेंदर यादव यांनी जी-२० च्या झेंड्यासोबत १० हजार फूट उंचीवर स्कायडायविंग केली. २७ सेकंदाच्या व्हिडीओत पाहू शकता की, विंग कमांडर हसत हसत १० हजार फूट उंचीवर जी-२० चा झेंडा फडकावत आहेत. या झेंड्यावर जी-२० चा लोगो लावण्यात आला आहे आणि बॅकग्राऊंडला ‘८३’ चित्रपटातील ‘लहरा दो’ गाणं वाजत आहे.

नक्की वाचा – बायकोसाठी नवऱ्याने स्वत: बनवला LED लाईटचा लेहेंगा, भर लग्नमंडपात नवरी चमकली, पण…

इथे पाहा विंग कमांडरचा आकाशातील थरारक व्हिडीओ

७ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला ५० हजारांहून अधिक व्यूज मिळाले असून हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलंय, जय हिंद की वीर सेना..भारताला १ डिसेंबर २०२२ ला जी-२० परिषदेचं अध्यक्षपद दिलं होतं. जी-२० चे आतापर्यंत ६० हून अधिक शहरांमध्ये २०० पेक्षा जास्त प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf fighter pilot gajanand yadav hoisted g20 flag while doing 10000 feet skydiving in the air delhi g20 summit latest news nss