IAF Communal Post Hindu- Sikh: भारतीय हवाई दल (IAF) ने सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या एका दाव्यावर स्पष्टपणे उत्तर देत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल होणाऱ्या दाव्यानुसार, भारतीय हवाई दलातील शीख वैमानिक आणि कर्मचारी त्यांच्या हिंदू वरिष्ठांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास नकार देत आहेत. असे सांगणारी एक पोस्ट सध्या चर्चेत होती.

काय होत आहे व्हायरल?

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने भारतीय हवाई दलातून माहिती मिळाल्याचा दावा करत, असा आरोप केला की, बहुसंख्य शीख वैमानिक आणि कर्मचारी त्यांच्या हिंदू वरिष्ठांकडून होणाऱ्या नियमित अपमानामुळे आपले काम करण्यासाठी नकार देत आहेत. हा दावा अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केला होता. प्रचंड व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर कमेंट करत भारतीय हवाई दलात सेवा करणाऱ्या शीख अधिकाऱ्यांच्या व काहींनी हिंदू अधिकाऱ्यांवर सुद्धा टीका केली होती. या प्रकरणाला जातीय वळण मिळत असताना अखेरीस भारतीय हवाई दलाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले.

Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
jitendra awhad
Somnath Suryavanshi : “अदृश्य शक्तींनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली”, शवविच्छेदन अहवालावरून जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
MPs scuffle outside Parliament Case filed against Rahul Gandhi
संसदेबाहेर आखाडा! खासदारांमध्ये धक्काबुक्की; राहुल गांधींविरोधात गुन्हा
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट
BJPs attempt to balance power in ahilyanagar with elect Ram Shinde As Speaker of Legislative Council
राम शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यात सत्ता समतोलाचा भाजपचा प्रयत्न
congress
मुंबईत भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेसचं कार्यालय फोडलं, शाई अन् दगडफेक; पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न!

भारतीय हवाई दलाने एका अधिकृत निवेदनात, या पोस्टचा उल्लेख करत स्पष्टीकरण दिले आहे. “सदर व्हायरल पोस्टमधील माहिती खरी नाही आणि अफवा पसरवण्यासाठी पोस्ट करण्यात आली आहे. #IndianAirForce.” भारतीय वायुसेनेच्या ऑफिशियल X खात्याने एक फोटो देखील शेअर केला आहे.

८ तास बाळाचं निरीक्षण, डॉक्टरांनी मृत घोषित केलं; अंत्यसंस्काराच्या क्षणी बाळानेच..वडिलांनी सांगितलं प्रकरण

लक्षात घ्या, यापूर्वी सुद्धा भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्याच्या इतर शाखांना अनेकदा अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून संघटनांनी लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, भारताशी शत्रुत्व राखणारे देश भारतीय सैन्यात फूट आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी खोट्या कथनांचा प्रचार करतात असेही दिसून आले आहे. त्यामुळे असे दावे परस्पर शेअर करण्याऐवजी अधिकृत पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Story img Loader