UPSC Interview Tricky Questions: अनेक उमेदवार कित्येक वर्ष यूपीएससी परीक्षेची तयारी करत असतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार पाडणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असायला असावी. यावेळी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की, मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात पण उमेदवार उत्तरे देण्यात चुका करतात. या मुलाखतींमध्ये विचारले जाणारे अनेक प्रश सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. येथे असेच काही प्रश्न आहेत जे यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकतात. ज्याद्वारे तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : असा कोण आहे जो बुडत आहे, पण त्याला वाचवायला कोणी जात नाही?
उत्तर : सूर्याला कोणीही वाचवू शकत नाही, खरे तर संध्याकाळी सूर्य मावळला की त्याला वाचवायला कोणी जात नाही.
प्रश्न : पृथ्वीवर सहा दिवस श्वास न घेता कोण जगू शकेल?
उत्तर : विंचू
प्रश्न : गणपतीचे चित्र कोणत्या देशाच्या नोटांवर छापले होते?
उत्तर : इंडोनेशियन नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला होता. मात्र, नंतर ही नोट बंद करण्यात आली.
प्रश्न : अशी कोणती भाषा आहे, जी खाल्ली जाऊ शकते?
उत्तर : चिनी (साखर)
प्रश्न : अशा एका वस्तूचे नाव सांगा, जी खाण्यासाठी विकत घेतली जाते पण जमिनीत पेरता येत नाही?
उत्तर : जेवणाचे ताट. आपण जेवणाचे ताट खरेदी करू शकतो, पण ते जमिनीत पेरू शकत नाही.
प्रश्न : वकील काळा कोट का घालतात?
उत्तर : असे मानले जाते की काळा रंग आत्मविश्वास आणि शिस्तीचे प्रतीक आहे, ज्यामुळे वकील काळा कोट घालतात.
प्रश्न : कोणता देश आहे जेथे सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे मोफत आहे?
उत्तर : लक्झेंबर्गमध्ये सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे विनामूल्य आहे.