UPSC preparation : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेकजण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेहनत घेतात. पण यश प्रत्येकाला मिळत नाही. असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी मध्येच धैर्य गमावले आणि पुन्हा परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. यूपीएससीच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसही चालवले जातात. सामग्री निर्माते देखील असे व्हिडिओ बनवतात. पण एका आयएएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर परिक्षेसंदर्भात टिप्स दिल्या आहेत, तसेच एवढा अभ्यास करायची गरज नाही असंही सांगितलंय…

आयएएस अधिकारी अवनीश शरण हे सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतात. ते यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवानुसार काही खास टिप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देत असतात.शासकीय नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना या टिप्समुळे खूप फायदा होतो. यूपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आपण १८ ते २० तासांपर्यंत अभ्यास केल्याचा दावा करतात. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खरंच किती तास अभ्यास करावा लागतो, यासह इतर काही प्रश्नांवर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांचं मत जाणून घेऊ या.

पाहा पोस्ट

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती तास अभ्यास करावा?

प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. काही जण काही तास अभ्यास करून सर्व काही लक्षात ठेवतात, तर काहींना दहा ते बारा तास अभ्यास करूनही परीक्षेत अपयश येतं. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवर (पूर्वीचं ट्विटर) यू-ट्यूब व्लॉगचे दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यात १८ तास अभ्यासाचं नियोजन सांगितलं आहे. यावर शरण यांनी लिहिलं आहे, की अशा व्लॉगपासून दूर रहा. एवढा अभ्यास करायची गरज नाही.

आयएएस अवनीश शरण यांनी दिली अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं

आयएएस अवनीश शरण यांनी अशी चुकीची माहिती देणाऱ्या व्लॉगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंदेखील दिली आहेत.

हेही वाचा >> VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…

नेमका किती तास अभ्यास केला पाहिजे?

नेमका किती तास अभ्यास केला पाहिजे? या प्रश्नावर आयएएस अवनीश शरण “अभ्यास किती तास केला यामुळे काही फारसा फरक पडत नाही. तर कशाप्रकारे केला हे महत्त्वाचं आहे असं ते सांगतात.” दरम्यान मी सुद्धा एकदा १८ तास अभ्यास केला होता मात्र त्यानंतर पुन्हा १८ तास झोपलो. त्यामुळे एवढा अभ्यास करायची गरज नसल्याचं ते सांगतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias officer awanish sharan share mpsc examination preparation tip explain how many hours study required to pass upsc srk