IAS Officer Shares Virat Kohli Class 10 Marksheet : संपूर्ण क्रिकेटविश्वात धावांचा पाऊस पाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७५ शतके ठोकणारा विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता तर विराटच्या शिक्षणाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. विराटची सेकंडरी बोर्ड परीक्षेची दहावीची मार्कशिट इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. आएएस ऑफिसर जितिन यादव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर विराटची इयत्ता १० वीच्या मार्कशिटचा फोटो शेअर केला आहे. मार्कशिटचा फोटो शेअर करत यादव यांनी लोकांना जबरदस्त मेसेज दिला आहे. सुंदर कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केल्याने यूजर्सने खूप चांगल्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आएएस अधिकारी जितिन यादव यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर कॅप्शनमध्ये म्हटलंय की, जर नंबरच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतील, तर संपूर्ण जग या व्यक्तीला पाठींबा देत नसता. यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि जिद्दीची गरज असते. विराट कोहलीला दहावीच्या बोर्ड परीक्षेत सामान्य गूण मिळाले होते. इंग्लिश आणि सोशल सायन्समध्ये ८० पेक्षा जास्त गुण आहेत.परंतु, गणित आणि विज्ञानात विराटला ५१ आणि ५५ गुण मिळाले आहेत. परंतु, सध्याच्या घडीला विराटला मिळालेलं यश मोजण्यासाठी प्रत्येक गोष्ट छोटी वाटेल.

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत लोकांची गर्दी दिसतेय ना? पण एक कार सुद्धा लपलीय, दिसली नसेल तर क्लिल करून पाहा

तो त्याच्या करीअरच्या अव्वल स्थानावर आहे आणि क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा विराट कोहलीसारखा क्रिकेट बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ९ ऑगस्टला शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, गुण फक्त कागदावर लिहिलेले नंबर असतात. पॅशन आणि डेडीकेशन याच महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्याशी मी सहमत आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, खऱ्या आयु्ष्यात नंबर नाही तर मेहनत कामी येते.