‘द एलिफंट विस्परर्स’ (The Elephant Whisperers) या भारतीय शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्मनं ‘ऑस्कर २०२३’मध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्मचा पुरस्कार पटकावला होता. या शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्मची गोष्ट हत्ती आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याभोवती फिरते. त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या हत्तीचं नाव ‘रघू’ असं आहे. तर, आज याच रघूची आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी भेट घेत खास पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील तमिळनाडूमधील थेप्पाकडू हत्ती कॅम्पला भेट दिली होती. तर या कॅम्पमध्ये त्यांनी न चुकता ‘रघू’ची भेट घेतली आहे. तसेच कॅम्पमधील रघू आणि इतर हत्तींना त्यांनी ऊस खाऊ घातले आहेत. तसेच या खास क्षणाचा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी कॅप्शन लिहिली आहे. आयएएस अधिकारी साहू यांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे एकदा तुम्हीसुद्धा पाहा.
हेही वाचा…‘फ्लाइंग पराठा’ कधी खाल्ला आहे का? विक्रेत्याने पराठे लाटले अन्… पाहा व्हायरल VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत आयएसएस सुप्रिया साहू हत्तीबरोबर प्रेमळ गप्पा मारताना आणि त्यांना ऊस खाऊ घालताना दिसल्या. तसेच त्यांनी या खास क्षणाबद्दल व्यक्त होताना त्यांनी लिहिलं, “आमच्या थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये वाढणाऱ्या ‘बोम्मी’ व ‘रघू’ यांना भेटल्याशिवाय ही सहल पूर्ण झाली नसती. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांना या सुंदर हत्तींना भेटण्यासाठी मुदुमलाईला नक्की घेऊन जा”, अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.
थेप्पाकडू कॅम्प हा सर्वांत जुना हत्ती कॅम्प आहे. सध्या या कॅम्पमध्ये अनेक हत्ती आहेत. हत्तींना प्रशिक्षण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी या कॅम्पमध्ये खास लोक कार्यरत आहेत. तर या कॅम्पला भेट देऊन, आयएसएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी @supriyasahuias या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा खास अनुभव शेअर केला आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत.