झाडे लावा झाडे जगवा! हे वाक्य आपण अगदीच लहानपणापासून ऐकत आलो आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून प्राणवायू आपल्याला फुकट मिळतो. पण, कारखाने, उंच इमारती, विविध कंपन्यांचे तर मेट्रोचे बांधकाम आदी गोष्टींमुळे आपण मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत सुटलो आहे. झाडे जगविण्यासाठी आधी झाडे लावून तरी दाखविली पाहिजेत, हे ओळखून ‘झाडे लावा’ मोहीम सुरू करून प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. तर हीच बाब लक्षात घेता आयएएस ऑफिसर शुभम गुप्ता यांनी एक अनोखी गोष्ट सुरू केली आहे आणि झेंडूच्या रोपाच्या बियांसह एम्बेड केलेले व्हिजिटिंग कार्ड सादर केले आहे.

आयएएस अधिकाऱ्याने बदल घडवून आणण्याचा एक मार्ग शोधून काढला आहे. आयएएस अधिकारी शुभम गुप्ता सध्या महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कूपवाड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आयएएस अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये सामान्य माणसांपासून ते अगदी मोठ मोठ्या पोस्टवर असणारे अधिकारीसुद्धा आले तरीही ते त्यांना एक व्हिजिटिंग कार्ड देत. पण, हे व्हिजिटिंग कार्ड साधेसुधे नसून त्याची जर तुम्ही लागवड केली, तर त्याचे रूपांतर सुंदर अशा झेंडूच्या रोपट्यात होईल. एकदा पाहाच आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट…

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Despite the Pedestrian Safety Policy non implementation forces pedestrians to walk on roads
पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
Pan Card For Minor
Pan Card For Minor :१८ वर्ष पूर्ण होण्याआधी काढू शकता पॅन कार्ड, फक्त ‘ही’ कागदपत्रे लागणार; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस…

हेही वाचा…शेवटी प्रेम! आईचे प्रशिक्षण अन् ‘तिने’ स्पर्धेत सादर केलं कथक नृत्य; VIDEO पाहून चटकन डोळ्यात येईल पाणी

पोस्ट नक्की बघा…

अनेक व्यापारी, डॉक्टर, अधिकारी यांना भेटायला गेल्यावर आपल्याला ते व्हिजिटिंग कार्ड देतात; जेणेकरून काही गरज किंवा मदत लागल्यास आपण त्यांना कॉल करू शकतो किंवा त्यांना पुन्हा भेटायला येऊ शकतो. पण, घरी गेल्यानंतर हे व्हिजिटिंग कार्ड घराच्या एखाद्या कोपऱ्यात धूळ खात पडून राहते आणि शेवटी ते कचराकुंडीत जाते. तर ही बाब लक्षात घेता बहुधा आयएएस अधिकारी यांनी हा मार्ग शोधून काढला आणि त्यांची माहिती, नाव लिहिलेलं व्हिजिटिंग कार्डमध्ये झेंडूच्या रोपाच्या बिया एम्बेड केल्या. आयएएस अधिकाऱ्यांनी पारंपरिक व्हिजिटिंग कार्ड्सद्वारे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर लक्ष तर दिलेच आणि हिरवळ आणि पर्यावरण विषयक जागरूकताही वाढवली.

सोशल मीडियावर ही पोस्ट आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अधिकृत @ShubhamGupta_11 एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. फोटोमध्ये प्रत्येक कार्डवर एक संदेश लिहिण्यात आला आहे की, ‘या व्हिजिटिंग कार्ड्सची लागवड केल्यास त्याचे रूपांतर सुंदर झेंडूच्या रोपट्यात होईल’, असे त्यांनी कॅप्शनमध्येसुद्धा नमूद केलं आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून ‘आमच्या पर्यावरणासाठी चांगला उपक्रम. आपल्या देशात असा जबाबदार अधिकारी असल्याचा अभिमान वाटतो’, आदी अनेक कमेंट करताना दिसून येत आहेत.

Story img Loader