Viral Video: जंगल सफारीला जाताना कोणते प्राणी, पक्षी पाहायचे याची यादी आपण मनात केलेली असते. जंगलात दिसणारा प्रत्येक प्राणी आणि पक्षी आपल्याला त्याच्या आगळ्या सौंदर्याने मोहवून टाकतो. त्यांच्या हालचाली, हावभाव मनस्वी आनंद देतात. पण, त्यांच्याही जीवनात दररोज हृदयस्पर्शी गोष्टी घडत असतात. शिकारीदरम्यान कुटुंबातील व्यक्तींना गमावणे या आणि अशाच बऱ्याच गोष्टी त्यांच्याबरोबरही घडतच असतील. तर याचसंबंधित माहिती अनेक आयएएस आणि आयएफएस अधिकारी त्यांच्या पोस्टमधून देत असतात. आज आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी एका हत्तीची गोष्ट त्यांच्या पोस्टमधून सांगितली आहे.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू नियमितपणे त्यांच्या सोशल मीडियावर वन्यप्राण्यांबद्दलची माहिती शेअर करीत असतात. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी तमिळनाडू वनपालांनी एका हत्तीच्या पिल्लाला दत्तक घेतल्याची एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी वनपालांनी एका आजारी हत्तीच्या तीन महिन्यांच्या पिल्लाचे प्राण क्रेन वापरून, अथक परिश्रम घेत वाचवल्याची माहिती देत एक अपडेटेड व्हिडीओ शेअर केला होता. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केलेली ही पोस्ट तुम्हीसुद्धा बघा…

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ

हेही वाचा…भररस्त्यात जाळला एन. चंद्राबाबू नायडूंचा फोटो; भाजपाला पाठिंबा दिल्याने लोक संतप्त? पण, व्हायरल VIDEO मागचे सत्य काय?

व्हिडीओ नक्की बघा…

तुम्ही पोस्टमध्ये पाहिले असेल की, तीन महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लाला क्रेन वापरून जेव्हा बाहेर काढले. तेव्हा उपचार व देखरेखीनंतर त्या पिल्लाला सुखरूपपणे हत्तींच्या कळपात सोडण्यात आले. पण, आता गोष्टीला एक वेगळेच वळण मिळाले आहे. त्या हत्तिणीने तिच्या पिल्लाला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे हत्तीचे पिल्लू एकटेच भटकत राहिले. मग त्यामुळे वन पालांनी दया आणि जबाबदारी दाखवीत त्या हत्तीच्या पिल्लाला दत्तक घेत, त्यांच्या देखरेखीखाली घेऊन त्यांच्या कुटुंबात त्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओत तमिळनाडूचे वनपाल त्याची काळजी घेताना, त्याला पाणी पाजताना दिसून आले.

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या अधिकृत @supriyasahuias एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांच्या भावना व्यक्त करताना लिहिले, ‘आमच्या देखरेखीखाली असलेल्या तीन महिन्यांच्या हत्तीच्या बाळाला आलिंगन देत असताना शब्दांपलीकडची ही भावना! त्याच्या आईने त्याला सोडून दिले आहे. तीन महिन्यांचे हत्तीचे पिल्लू जमिनीवर पडलेले होते. ३ जून रोजी तमिळनाडूच्या वनपालांनी हत्तीच्या पिल्लाला क्रेनच्या साह्याने उचलून आणले आणि त्याच्या तब्येतीची काळजी घेतली. हत्तीच्या पिल्लाला तमिळनाडूमधील थेप्पा कॅम्पमध्ये आणण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता’; असे त्यांनी कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.