भारतीयांना कायमच इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड वाटतो. आपल्या आजूबाजूचे अस्खलित इंग्रजी बोलतात आणि आपल्याला मात्र एखादं वाक्य बोलायचं झालं तरी मनात शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. आपल्याला इंग्रजी येत नाही म्हणून आजूबाजूचे आपल्यावर हसतील, आपल्याला चिडवतील अशी भीती सारखी मनात येते. इंग्रजी न येणं कमीपणाचं वाटतं. पण, असा न्यूनगंड तुमच्याही मनात येत असेल तर सनदी अधिकारी सुरभी गौतम हिचे व्हायरल होणारं हे भाषण जरूर ऐका.
जगप्रसिद्ध कॉम्प्युटर वॉलपेपरची छबी टिपणारा फोटोग्राफर नव्या मोहीमेवर
मध्यप्रदेशमधल्या एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. शाळेत असल्यापासून ती खूप हुशार होती. शिकून खूप मोठं व्हायचं, कुटुंबियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करायची असं स्वप्न उराशी बाळगून तिने मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सगळी मुलं अस्खलित इंग्रजी बोलून आपला परिचय करून देत होती. आपल्यालाही इंग्रजी बोलावं लागणारं या विचारानंच तिच्या पोटात गोळा आला. इतर मुलं आपला परिचय कसा करून देतात हे व्यवस्थित ऐकून वाक्यांची जुळवाजुळव करत तिनं शिक्षकांना आणि इतर वर्गमित्रांना आपला परिचय करून दिला. ती वेळ निभावली असं तिला वाटत असताना शिक्षकांनी तिला एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर न देता ती केवळ गप्प बसून राहिली. यावरून संपूर्ण वर्गासमोर शिक्षकांनी तिचा अपमान केला. तिला उत्तर माहिती होतं पण ते इंग्रजीत कसं द्यायचं हे तिला माहिती नसल्यानं ती फक्त गप्प बसून राहिली. वर्गासमोर झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला. पण, पुढे हिच मुलगी अस्खलित इंग्रजी बोलू लागली. हा बदल कसा झाला सामान्य घरातून आलेली ही मुलगी आयएएस अधिकारीच्या पदापर्यंत कशी पोहोचली? या प्रश्नांचे उत्तर आणि तिचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल. हा पाहून तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल!