दरवर्षी लाखो लोक यूपीएससी सीएसई परीक्षेसाठी तयारी करतात; पण त्यापैकी काही निवडक लोकच यशस्वी होतात. तसेच पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा यशस्वी होणारेही काही मोजकेच आहेत. २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी लघिमा तिवारी या मोजक्या यशस्वी उमेदवारांपैकी एक आहेत. लघिमा यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

कोचिंगशिवाय UPSC केली क्रॅक

लघिमा तिवारी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासला न जाता, स्वत: रात्रंदिवस अभ्यास करून आपले आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. २०२२ च्या यूपीएससी सीएसई परीक्षेत लघिमा ऑल इंडिया रँकिंगमध्ये १९ व्या आल्या.

लघिमा तिवारी यांनी यातून असे सिद्ध केले की, कोचिंग क्लासशिवायही यूपीएससीसाठी अवघड परीक्षेत कमी वेळात यशस्वी होता येते. त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, त्यांनी यूट्युबवरील यूपीएससी टॉपर्सच्या मुलाखतींचे व्हिडीओ पाहून त्यांनी माहिती मिळवली. अनेक चालू घडामोडी आणि अभ्यासातील काही भाग त्यांनी यातून कव्हर केला.

लघिमा यांनी २०२१ मध्ये दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये बॅचरल पदवी घेतली आहे. पदवीनंतर त्यांनी लगेचच यूपीएससीची वर्षभर तयारी सुरू केली होती.

वडिलांची साथ अन् मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS; कोण आहेत स्वाती मीना? जाणून घ्या खास कहाणी

लघिमा यांच्या यशाचा मंत्र

लघिमा मूळच्या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. विज्ञानाची आवड असल्याने त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वत: काळजीपूर्वक अभ्यास करा आणि यश मिळवा हाच त्यांच्या यशाचा मंत्र होता.

लघिमा यांनी अनेकदा इच्छुक उमेदवारांनाही सल्ला दिला की, काही तास अभ्यास करून सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर त्यांना सर्वोत्तम परिणाम मिळू शकतो. त्यासाठी त्यांनी इच्छुकांना परीक्षेसाठी नेहमी पुढची तयारी करण्याचे आवाहन केले. तसेच यश मिळेपर्यंत सतत प्रयत्न करीत राहण्याचा सल्ला दिला.

आउट-ऑफ-द-बॉक्स जाऊन केली विषयाची निवडी

दरम्यान, पदवीसाठीची शेवटी परीक्षा संपताच उमेदवारांनी वेळ वाया न घालवता, मुख्य परीक्षेची तयारी तातडीने सुरू करण्याचे आवाहन त्या करतात. इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत जीवशास्त्राचा अभ्यास करीत असतानाही यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी त्यांनी मानववंशशास्त्र हा पर्यायी विषय म्हणून निवडला. त्यातून लघिमाने यांनी सिद्ध केले की, आउट-ऑफ-द-बॉक्स निवडीतूनही यश मिळवता येऊ शकते.

त्यांनी यूपीएससी परीक्षेतील यशाचे श्रेय आपल्या पालकांना दिले आणि सांगितले की, नागरी सेवांमध्ये करिअर करणारी त्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या आहेत. दरम्यान, आयएएस लघिमा तिवारी यांचा हा प्रवास महत्त्वाकांक्षी उमेदवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर मेहनत, सातत्य आणि अभ्यास करण्याची तयारी असेल, तर कोणतेही स्वप्न साध्य करता येते हेच यातून त्यांनी सिद्ध केले.