IBM Employee On Sick Leave For 15 Years : २००८ पासून आजारपणामुळे रजेवर असलेल्या एका वरिष्ठ आयटी कर्मचाऱ्याने त्याच्या कंपनीविरुद्ध तक्रार करत कोर्टाकडे धाव घेतली आहे. अहवालानुसार, इयान क्लिफर्ड हा IBM मधील कर्मचारी मागील १५ वर्षांपासून सुट्टीवर होता. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो २०१३ पासून ‘वैद्यकीयदृष्ट्या निवृत्त’ आहे. मात्र आता त्याने आपल्याविरुद्ध कंपनीने ‘अपंगत्वाच्या नावे भेदभाव’ केल्याचा आरोप केला आहे. १५ वर्षे सुट्टीवर असताना त्याचा पगार वाढला नव्हता.

IBM हेल्थ प्लॅन अंतर्गत, आयटी तज्ज्ञांना वर्षाला ५४,००० पौंड (रु. ५५,३०,५५६) पेक्षा जास्त पगार मिळतो आणि संबंधित व्यक्ती ६५ वर्षांची होईपर्यंत पगार मिळण्याची हमी दिली जाते. मात्र क्लिफर्डच्या बाबत टेलीग्राफने सांगितलेल्या माहितीनुसार, त्याला कंपनीतर्फे १५ वर्षात पगारवाढ मिळाली नव्हती. आणि त्याच्या मतानुसार, हेल्थ प्लॅन सर्वसमावेशक नाही आणि वाढत्या महागाईमुळे त्याचा पगारही पुरेसा नाही.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
job Pune Municipal Corporation, people left job Pune Municipal Corporation, Pune Municipal Corporation news,
पुणे : पालिकेच्या नोकरीला ७१ जणांनी केला रामराम, नक्की काय आहे प्रकार !

क्लिफर्ड सप्टेंबर २००८ मध्ये पहिल्यांदा आजारपणामुळे रजेवर गेले आणि २०१३ मध्ये त्यांनी कंपनीविरुद्ध तक्रार केली होती . त्याच्या तक्रारीकडे लक्ष देऊन, IBM ने त्याला ‘तडजोड करार’ ऑफर केला ज्यामध्ये त्याला कंपनीच्या अपंगत्व योजनेत समाविष्ट केले गेले जेणेकरून त्याला कामावरून काढले जाणार नाही. योजनेंतर्गत, काम करण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीला कामावरून काढले जात, अशा व्यक्तीला काम करण्याच्या बंधनाशिवाय कर्मचारी हक्क राखून ठेवता येतात.

योजनेतील कर्मचार्‍याला रिकव्हरी, रिटायरमेंट किंवा त्याआधी मृत्यू येईपर्यंत मान्य कमाईच्या ७५% रक्कम दिली जाते. प्राप्त माहितीनुसार, त्याचा मान्य पगार ७२,०३७ पौंड होता, म्हणजे २०१३ पासून त्याला २५ % कमी करून प्रति वर्ष ५४,०२८ पौंड दिले जातील असे सांगण्यात आले. हा प्लॅन पुढील 30 वर्षांहून अधिक काळासाठी निश्चित करण्यात आला होता जो निवृत्तीचे वय (६५) पर्यंतचा कालावधी कव्हर करत होता.

फेब्रुवारी २०२२ मध्ये, क्लिफर्डने IBM कंपनी अपंगत्वाच्या नावे भेदभाव करत असल्याचा दावा करत रोजगार न्यायाधिकरणाकडे हे प्रकरण नेले. यावेळी युक्तिवाद करत क्लिफर्ड म्हणाला की, “योजनेचा मुद्दा काम करू शकत नसलेल्या कर्मचार्‍यांना सुरक्षा देणे हा होता जर पगार कायमचा गोठवला गेली तर ही मदत कशी झाली?”

दरम्यान, रोजगार न्यायाधिकरणाने त्याचे दावे फेटाळून लावले, न्यायाधीशांनी त्याला अगोदरच “खूप भरीव लाभ” आणि “अनुकूल उपचार” देण्यात आले आहेत असे म्हणत ही तक्रार फेटाळून लावली.

हे ही वाचा<< गच्च भरलेल्या मेट्रोत कपलचा अश्लील Video व्हायरल; तरुणीची अवस्था पाहून नेटकरी थक्क

न्यायाधीश हाऊसगो म्हणाले, “सक्रिय कर्मचार्‍यांना पगारात वाढ मिळू शकते, निष्क्रिय कर्मचार्‍यांना नाही, हा फरक आहे, यात अपंगत्वाचा मुद्दाच येत नाही. तक्रार अशी आहे की प्लॅनवर निष्क्रिय कर्मचारी असण्याचा फायदा पूरक नाही कारण ६ एप्रिल २०१३ पासून रक्कम ठराविक आहे हा वाद योग्य नाही कारण जरी प्रति वर्षाचे मूल्य ५०,००० पौंड हे 30 वर्षांच्या हिशोबाने निम्मे झाले असले तरी, तरीही तो खूप मोठा फायदा आहे.’ ‘