ICAI CA Results 2025 Out: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने आज चार्टर्ड अकाउंटंट्स इंटरमीडिएट आणि फाउंडेशन परीक्षांचे निकाल जाहीर केले. सीए इंटर, फाउंडेशन परीक्षेत बसलेले उमेदवार स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी ICAI icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात, निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. निकालात प्रवेश करण्यासाठी त्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी त्यांची लॉगिन डिटेल्स भरणे आवश्यक असेल.उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की निकालात पाहण्यासाठी त्यांना रोल नंबरसह नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ICAI ने ११ जानेवारी, १३ आणि १५ जानेवारी रोजी गट I साठी आणि १७, १९, आणि २१ जानेवारी २०२५ रोजी गट II साठी CA इंटर जानेवारी परीक्षा आयोजित केली होती. सर्व पेपर्स सर्व दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत झाले. दरम्यान, ICAI ने ICAI CA फाउंडेशन निकाल 2025 देखील जारी केले आहेत. उमेदवार icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

ICAI CA Intermediate Result 2025: निकाल कसे डाउनलोड करायचे ते येथे पाहा

  • सीए इंटरमीडिएट निकाल तपासण्यासाठी उमेदवार खाली स्टेप्स फॉलो करा
  • ICAI निकालाच्या वेबसाइटला icai.nic.in वर भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, ICAI CA इंटरमीडिएट जानेवारी 2025 चे निकाल डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • लॉग इन करण्यासाठी तुमचे डिटेल्स एंटर करा.
  • तुमचा ICAI CA इंटरमीडिएट निकाल 2025 स्क्रीनवर तुम्हाला दिसेल

सुमारे १४.१७ टक्के उमेदवार सीए इंटर ग्रुप १ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. १,०८,१८७ उमेदवारांपैकी १५,३३२ उमेदवार पात्र ठरले. गट २ च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २२.१६ टक्के आहे. उपस्थित झालेल्या ८०,३६८ पैकी १७,८१३ पात्र ठरले आहेत. दोन्ही गट परीक्षा उत्तीर्णतेची टक्केवारी १४.०५ टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ४८,२६१ उमेदवारांपैकी फक्त ६,७८१ उत्तीर्ण झाले.

ICAI CA Intermediate Results 2025 declared google trends

सीए इंटरमिजिएट परीक्षेत हैदराबाद येथील दीपांशी अग्रवाल हिने ८६.८३ टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. विजयवाडा येथील थोटा सोमनाध शेषाद्री नायडू यांनी ८६ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. हातरस येथील सार्थक अग्रवाल ८५.८३ टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

फाऊंडेशन परीक्षेत एकूण उत्तीर्ण उमेदवारांची टक्केवारी २१.५२ टक्के आहे. पुरुष उमेदवारांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २१.२७ टक्के आहे, तर महिला उमेदवारांचे प्रमाण २१.२७ टक्के आहे.