Who Is Jarvo 69 From IND vs Aus World Cup Match: जार्वो 69 या नावाने ओळखला जाणारा डॅनियल जार्विस हा एक सोशल मीडिया प्रँकस्टर आहे ज्याने जगभरातील क्रिकेटच्या मैदानात सामना सुरु असताना आक्रमक एंट्री घेऊन प्रसिद्धी मिळवली आहे. रविवारी चेन्नई येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक २०२३ सामन्यादरम्यान याच जार्वोमुळे मैदानात गोंधळ झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडिओमध्ये, जार्वो त्यांच्या ६९ क्रमांकाच्या जर्सीसह मैदानात उपस्थित दिसून येत आहे तर विराट कोहली त्याला बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळतोय. केएल राहुल सुद्धा जार्वोला “सामना सुरु करायचा आहे आता मैदानातून जा” असे इशाऱ्याने सांगताना दिसतोय. मात्र जार्वो लगेचच त्याचा हट्टीपणा सोडत नाही, या एकूण गोंधळामुळे आता आयसीसीने त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राप्त माहितीनुसार, आयसीसीने जार्वोला स्पर्धेतील पुढील सामन्यांना उपस्थित राहण्यास बंदी घातली. पण त्याला व्हीआयपी क्षेत्रामध्ये प्रवेश कसा मिळाला आणि फील्ड ऑफ प्ले (एफओपी) मध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक स्तरांवर सुरक्षा रक्षक असतात मग तिथून तो आत आला तरी कसा हा प्रश्न कायम आहे.

आयसीसीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, “संबंधित व्यक्तीला कार्यक्रमात पुढील कोणत्याही खेळांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि हे प्रकरण भारतीय अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाची सुरक्षा हे आमचे प्राधान्य आहे. काय घडले हे समजून घेण्यासाठी आम्ही घटनास्थळावर तपास करू आणि ते पुन्हा घडू नये यासाठी काही अतिरिक्त सुरक्षा उपाय आवश्यक आहेत का याचा विचार करू.”

दरम्यान, ब्रिटनच्या या जार्वोने अशाप्रकारे भारताच्या सामन्यांमध्ये येऊन गोंधळ व सुरक्षा भंग केल्याची ही चौथी वेळ आहे. २०२१ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यानही त्याने असाच गोंधळ घातला होता. यामुळे अनेकांनी इंग्लंडच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे म्हटले होते ज्यामुळे जार्वोला इंग्लंडच्या मैदानांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती.

IND vs AUS जिंकूनही के.एल. राहुल नाराज का? म्हणाला “मी जरा जास्तच चांगला शॉट मारला पण…”

एकीकडे, भारतीय समर्थक तिकीट मिळवण्यासाठी झटत असणाऱ्या, जार्वोसारख्या प्रिमियम व्हीआयपी पास मिळवणाऱ्यांवर कालच्या प्रकारानंतर प्रचंड टीका होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc bans jarvo 69 from all world cup 2023 matches ind vs aus chaos running in ground virat kohli k l rahul also angry svs
Show comments