Cricket World cup 2023: वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. पुढचा दीड महिना बॅट आणि बॉलमधली ही जुगलबंदी रंगणार आहे. भारताच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्याल अजून दोन दिवस असले तरी सर्वत्र क्रिकेटमय वातावरण झाले आहे. भारतीय फॅन्स टीम इंडियाला जिंकताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या क्रिकेटच्या मॅचेससाठी अनेकांना भारत आणि पाकिस्तान या देशांदरम्यान होणाऱ्या मॅचेस म्हणजे मनोरंजनाची फूल मेजवानीच असते. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील चाहते या मॅचेसची वाट पाहत असताना पाकिस्तानातील एका गायकाचे वर्ल्ड कप गाणे खूपच व्हायरल झाले आहे. चाहत फतेह अली खान नावाच्या या स्वत:ला गायक म्हणवणाऱ्या गायकाचं गाणं ऐकून हसून हसून तुमची पुरती वाट लागेल. चला तर मग पाहू या व्हायरल होणारं गाणं कोणतं आहे.

पाकिस्तानच्या गायकाचं वर्ल्ड कपवर गाणं

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

हे गाणं ऐकून काही नेटकरी मात्र वैतागले आहेत. किंबहुना हे गाणं त्वरित बंद करा, अशी मागणी ते करीत आहेत. काही जणांनी तर मीम्सच्या माध्यमातून या गाण्याची खिल्लीसुद्धा उडवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या गाण्यात हा गायक मजेशीर अंदाजात आपल्या पाकिस्तानी टीमला शुभेच्छा देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ते एक दशलक्षहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या व्हिडीओत चाहत फतेह अली खान पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला प्रोत्साहन देताना दिसत आहे. यावेळी गायक चाहत फतेह अली खान गाण्यातून ‘जीतेंगे भाई जीतेंगे’ असे गाताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> काय सांगता?…म्हणे अख्खं बस स्टॉप चोरीला गेलं; १० लाखांचं आठ दिवसापूर्वीच केलं होतं काम

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

क्रिकेटवेड्या भारतात तब्बल १२ वर्षांनी खेळवण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काल सुरुवात झाली. २०११ च्या विश्वचषकानंतर भारताचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे हा वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी भावनिक आहे. दरम्यान, या व्हिडीओवर, अरे बंद करा हे गाणं, गाणं ऐकून कानांतून रक्त निघालं, हे गाणं कसं तयार केलं असेल? अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनेक नेटकरी देत आहेत. तुम्हीही हे गाणं ऐकून हसून हसून लोटपोट व्हाल.

Story img Loader