Cricket World Cup 2023:  भारतात क्रिकेटच्या वर्ल्ड कप स्पर्धेची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतातील लोक केवळ भारतीय क्रिकेट संघालाच नाही, तर इतर देशांच्या क्रिकेट संघांनाही पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये गर्दी करीत आहेत. आतापर्यंत झालेल्या इतर संघांच्या सामन्यांमध्येही भारतीय उत्सुकता दाखवताना दिसले. त्यामुळे भारतीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यात भारतीय प्रेक्षक एका किंवा दुसऱ्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे नुकताच झालेला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी परदेशीच नाही, तर भारतीय प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. याच सामन्यादरम्यानचा एका परदेशी क्रिकेट चाहत्याने तयार केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; ज्यात एक परदेशी क्रिकेट चाहता प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये उभा राहून जय श्री रामचा नारा देत आहे. त्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही त्याला साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये एक परदेशी क्रिकेट चाहता उभा राहून भारतीय प्रेक्षकांसमोर जय श्री रामचा नारा देत आहे. मग इतर उपस्थित शेकडो प्रेक्षकही त्याच्याबरोबर जय श्री रामच्या घोषणा देताना दिसले. तो परदेशी क्रिकेट चाहता ऑस्ट्रेलिया संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता, असे म्हटले जात आहे. अनेक वेळा जय श्री राम आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्यानंतर प्रेक्षकांमधूनही कोणीतरी मजेशीरपणे या परदेशी क्रिकेट चाहत्याच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियामाता की जय, असा नारा देताना ऐकू येत आहे. त्याची नारेबाजी ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनव उपाध्याय नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी लाइक केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “हे भारतीय काहीही बोलतात.” आणखी एका युजरने गमतीने लिहिलेय, “ऑस्ट्रेलियामाता की जय म्हणणारा नक्कीच हरियाणाचा असावा.” तिसर्‍या युजरने लिहिलेय, “हे सन्मान द्या अन् सन्मान घ्याचे उत्तम उदाहरण आहे.” तर चौथ्याने लिहिलेय, “अहो, तो अगदी सॅम करनसारखा दिसतोय.”