जगात अशी ठराविक माणसं असतात, जे त्यांच्या जिवंतपणी आणि मरणानंतरही कायम माणसांच्या आठवणीत राहतात. असे व्यक्ती जेव्हा जगाचा निरोप घेतात तेव्हाचा क्षण कायम स्मरणात राहणारा असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांचा डोळे पाणावले आहेत. हा व्हिडीओ एका आईस्क्रीम विक्रेत्याच्या शेवटच्या प्रवासाचा आहे. गेल्या ४० वर्षापासून हा व्यक्ती आईस्क्रीम विकत होता. त्यांच्या अंतिम यात्रेत जे दृश्य पहायला मिळाले ते पाहून सारेच जण थक्क झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडेच लंडनमध्ये राहणाऱ्या हसन दर्विश (६२) नावाच्या व्यक्तीचं निधन झालं. तो आईस्क्रीम विकण्याचे काम करायचा. रिपोर्ट्सनुसार, तो जवळपास ४० वर्षांपासून आईस्क्रीम विकत होता. त्याच्या दफन विधीसाठी त्याचं पार्थिव कारमधून केंबरवेल स्मशानभूमीत नेण्यात आलं. यादरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या शेवटच्या प्रवासात अनेक ट्रक गाडीच्या मागे धावताना दिसले. हे सर्व ट्रक आइस्क्रीम विक्रेत्यांचे होते जे हसन दरवीश यांच्या अंतिम प्रवासासाठी आले होते.

आणखी वाचा : डान्स स्टेप्स कॉपी करायला निघाली आणि धपकन पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

हसन दर्विश या आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम प्रवासात जे दृश्य पहायला मिळाले ते सहसा एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या अंतिम यात्रेत पहायला मिळतात, ज्यामध्ये वाहनांच्या ताफा एकामागून एक निघत असतात. अगदी असंच चित्र या आईस्क्रीमवाल्याच्या अंतिम यात्रेत पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. एका आईस्क्रीम विक्रेत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतिम प्रवासात वाहनांच्या रांगा दिसणं हे फारच आश्चर्यकारक वाटत आहे.

आणखी वाचा : अरेरे! या आजोबांना काय दुर्बुद्धी सुचली आणि शांत उभा असलेल्या बैलाला काठी मारली…मग काय झालं पुढे, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जेव्हा तीन खतरनाक किंग कोब्रांमध्ये बैठक होते…VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले, “गंभीर चर्चा सुरूये”

हे दृश्य पाहून लोकांना आश्चर्य वाटत असलं तरी ब्रिटीश समाजात ही प्रथा बर्‍याच काळापासून चालत आलेली आहे. जेव्हा जेव्हा एखादी आईस्क्रीम विक्रेत्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शेवटच्या प्रवासात इतर आइस्क्रीम विक्रेते त्यांचे ट्रक घेऊन त्यांच्या अंतिम प्रवासात सामील होतात.

आईस्क्रीमवाल्याच्या शेवटच्या प्रवासाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लुईसा डेव्हिस नावाच्या महिलेने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत १३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर ८ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडीओवर खूप भावूक कमेंटही केल्या आहेत.