देशात दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोक मारले जातात. नियम न पाळणे, खराब रस्ते, हेल्मेट न घालणे, वेगाची मर्यादा ओलांडणे अशा कारणामुळे दिवसाला शेकडो लोक आपले प्राण गमावतात. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येक देशाने आपापल्या परिने प्रयत्न सुरू केले आहे. आवश्यक तिथे गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षा मोहिम राबवून जनजागृती केली जाते.

‘या’ देशानं यंत्रमानवाला देऊ केलं नागरिकत्त्व

Viral Video : बजावूनही न ऐकणाऱ्या माणसांचं मग ‘या’ व्यक्तीसारखं होतं

पण आइसलँड या देशानं मात्र रस्ते अपघात रोखण्यासाठी भन्नाट उपाय शोधून काढला आहे. वेगाची मर्यादा न पाळल्याने येथे अनेक अपघात होतात, गतिरोधक आहेत पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. तेव्हा ‘ऑप्टिकल इल्यूशन’ या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी रस्त्यावर लांब ठोकळ्यांचं चित्र रेखाटलं आहे. दूरून येणाऱ्या चालकाला या ‘ऑप्टिकल इल्यूशन’ तंत्रामुळे रस्त्यावर ठोकळे लावण्यात आल्याचा भास होतो, त्यामुळे चालक गाडीचा वेग आपसूकच कमी करतो. या कल्पनेच सगळ्यांकडून कौतुक होताना दिसून येत आहे. फक्त आईसलँडच नव्हे, तर अनेक देशांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Story img Loader