Anand Mahindra Icon Of The Seas Video : जगातील सर्वांत मोठे क्रूझ जहाज ज्याला ‘आयकॉन ऑफ द सी’ नावाने ओळखले जाते. जे पाहताना जहाज नाही, तर तरंगणारे आलिशान शहर असल्याचे भासते. हे जहाज या वर्षी जानेवारीत आपल्या पहिल्या प्रवासासाठी निघाले. त्यानंतर त्याची लोकप्रियता इतकी वाढली की, २०२६ पर्यंत त्याची आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. त्यात आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही या जहाजाने भुरळ घातली आहे. त्यांनी या जहाजाचा एक व्हिडीओ शेअर करीत आपल्याकडेही असे जहाज असेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
रॉयल कॅरेबियनचे ‘आयकॉन ऑफ द सी’ हे जहाज अंदाजे १२०० फूट (३६५ मीटर) लांब आहे. या जहाजाची किंमत २०० कोटी रुपये इतकी आहे. आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेल्या या जहाजात २० डेक आहेत. त्यात सहा वॉटरस्लाइड्स, सात स्विमिंग पूल, एक आइस स्केटिंग रिंक, एक थिएटर आणि ४० हून अधिक रेस्टॉरंट्स, बार व लाउंज आहेत.
आनंद महिंद्रा यांनी या आलिशान जहाजाचा व्हिडीओ शेअर करीत लिहिले की, भारतीय हे जगातील दोन सर्वांत मोठ्या पर्यटक लोकसंख्येपैकी एक असतील. तोपर्यंत आम्ही आमच्या स्वत:च्या क्रूझ जहाजांची मागणी करू आणि आमच्याकडेही असे स्वत:चे क्रूझ असेल.
For Sunday leisure viewing.
— anand mahindra (@anandmahindra) May 19, 2024
It’s booked till ‘26.
But Indians will be one of the two largest tourist populations in the world…
And we will most likely demand—and get—our own cruise ships… pic.twitter.com/IgxW4YhyWZ
या जहाजावर मनोरंजनासाठी १६ टीम ऑर्केस्ट्रा, ५० संगीतकार व कॉमेडियनदेखील आहेत; जे प्रवाशांचे मनोरंजन करतात. हे जहाज एकाच वेळी ७,६०० प्रवासी घेऊन जाऊ शकते. त्यात २,३५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या जहाजात दोन इंजिने आहेत. विशेष बाब म्हणजे ‘आयकॉन ऑफ द सी’ नैसर्गिक वायूवर (एलएनजी) चालू शकते; ज्यामुळे प्रदूषण कमी होते.
‘आयकॉन ऑफ द सी’वर एक सेंट्रल पार्कदेखील बांधले गेले आहे; जिथे ३३,००० हून अधिक झाडे आहेत. या जहाजावर २०० फूट उंचीचा बंद घुमटही आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे जहाज इतके मोठे आहे की, त्याचे वजन टायटॅनिकपेक्षा पाच पट जास्त आहे.
या जहाजाचे भाडे तिकिटानुसार तीन ते ८३ लाख रुपयांपर्यंत आहे. तुम्ही जहाजावर उपलब्ध सुविधांचा आनंद घेऊ शकता. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जहाजाचे २०२६ पर्यंत आगाऊ बुकिंग झालेले आहे.