निरभ्र आकाश आणि गवताची कुरणे असलेली सूर्य प्रकाशात न्हाऊन निघालेली टेकडी.. कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर हा फोटो तुम्ही हजारो वेळा पाहिला असेल. ‘मायक्रोसॉफ्ट विंडोज् एक्सपी’ चा डिफॉल्ट वॉलपेपर असणारा हा फोटो जगातल्या जवळजवळ सगळ्या डेस्कटॉप युजर्सना परिचयाचा आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध झालेल्या आणि पाहिल्या गेलेल्या छायाचित्रांमध्ये या फोटोचं स्थान आजतागयात अबाधित आहे. सहज म्हणून काढलेला हा फोटो इतका प्रसिद्ध होईल याची कल्पना फोटोग्राफर चार्ल्स ओरेअर यांनी स्वप्नातही केली नव्हती. हा फोटो काढून दोन दशकं उलटली आहेत. आता चार्ल्सही वृद्ध झालेत. ते आता ७६ वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या फोटोनंतर मायक्रोसॉफ्टनं अनेक फोटोंची निवड वॉलपेपरसाठी केली. पण, चार्ल्स यांच्या फोटोची जागा कोणाही घेऊ शकलं नाही.

Video : किम जाँग उनच्या देशातून पळून जाण्यास जवान यशस्वी

म्हणूनच वयाच्या ७६ व्या वर्षी या ज्येष्ठ फोटोग्राफरवर खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ब्लिस’ नावाच्या या कॉम्प्युटर वॉलपेपरचं आता स्मार्टफोन व्हर्जनही येणार आहे. यासाठी फोटो टिपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आपला कॅमेरा घेऊन ते नव्या कामगिरीसाठी निघाले आहेत. ‘ब्लिस’ वॉल पेपरमधला फोटो टिपल्यानंतर २१ वर्षांनी त्यांच्याकडे ही कामगिरी सोपवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या वॉल पेपरसाठी फोटो टिपण्याकरता चार्ल्स सध्या दौऱ्यावर आहेत. या ज्येष्ठ फोटोग्राफरचा प्रवास ‘लुफ्तांझा एअरलाईन्स’नं कॅमेराबद्ध केला आहे.

जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये इव्हांका ट्रम्पसाठी मेजवानी

नव्या पिढीला आवडतील असे स्मार्टफोन वॉलपेपरसाठी फोटो टिपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याने कंपनीला त्यांच्याकडून खूपच मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आपल्या तरुण वयात त्यांनी ज्या प्रकारचा फोटो टिपला होता, तशीच कामगिरी ते आताही करू शकतात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader