एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कंपनी त्यांच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत करतात. काही वेळा कंपनीचे अधिकारी मर्यादेपलीकडे जाऊनही मदत करतात. पण आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांनी आपल्या मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अशी मदत केली आहे की त्यांच्या उदारतेचे कौतुक केल्याशिवाय आपण राहू शकत नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सीईओ व्ही. वैद्यनाथन यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांचे ५ लाख शेअर्स देऊ केले आहेत. या शेअर्सची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने गुरुवारी स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या नोटीसमध्ये ही माहिती दिली आहे.

बँकेने म्हटले आहे की एमडी आणि सीईओ व्ही वैद्यनाथन त्यांच्या उदारतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कंपनीच्या एका मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्याजवळ ठेवलेले बँकेचे ५ लाख शेअर्स मृतांच्या कुटुंबाला देऊ केले आहेत. या शेअर्सची सध्याची किंमत २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे

व्ही वैद्यनाथन अनेकदा त्यांचे कर्मचारी, प्रशिक्षक, घरगुती मदतनीस आणि चालक यांना मदत करून प्रसिद्धी झोतात आले आहेत. त्यांनी त्यांना कार किंवा घर घेण्यासाठी मदत केली आहे तर कधी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी भेट म्हणून शेअर्स दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैद्यनाथन यांनी आतापर्यंत ९ लाखांहून अधिक शेअर्स गिफ्ट केले आहेत, ज्यांची किंमत ३.९५ कोटी रुपयांहून अधिक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idfc first bank ceo gifted 5 lakh shares worth 2 cr to kin of deceased colleague pvp