अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबरला निधन झाले. तामिळनाडूनमध्ये जयललितांना मानणा-या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या निधनानंतर अजूनही तामिळनाडूची जनता शोकाकूल आहे. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ चेन्नईच्या मरिना बीचवर ६८ किलो वजनाची भव्य इडली बनवण्यात आली आहे. या इडलीवर जयललिता यांचा चेहरा साकारण्यात आला आहे.

वाचा : ‘मी हनुमान आणि मोदी श्रीराम’, हनुमानाच्या रुपात मोदी भक्त पोहोचला रॅलीत

चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात जयललिता यांचे तीव्र हृदय विकाराच्या इटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील जनता शोकाकूल झाली. जयललिता यांच्या निधनानंतर अनेक अम्मा समर्थकांनी सामूहिक मुंडन करुन घेतले. तर त्यांच्या निधनाची बातमी ऐकून ५०० हून अधिक जाणांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्यांच्या कुटुंबियांना अण्णा द्रमुकने ३ लाखांची मदत ही जाहिर केली होती. जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण जनतेच्या मनातले त्याचे स्थान मात्र नेहमीच उच्च राहिले. जयललिता यांनी अनेक लोकोपयोगी धोरणे राबवली. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर आला होता.  त्यांच्या काही समर्थकांनी ६८ किलो वजनाची आणि त्याचा चेहरा असलेली भव्य इडली बनवली. चेन्नईच्या मरिना बीचवर ही इडली त्यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आली.

Story img Loader