Viral Video : सध्या देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या तीन हजार नारळांपासून बनवलेल्या एका बाप्पाच्या मूर्तीची चांगलीच चर्चा सुरू आहे. १२ फूट उंच असलेली आणि हजारो नारळांपासून बनवलेली ही इको फ्रेंडली मूर्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडीओ उपराजधानी नागपूरमधील आहे.

दरवर्षी गणपतीचे आकर्षक देखावे पाहायला मिळतात. काही देखावे खूप क्रिएटिव्हिटी वापरून साकारलेले असतात. सध्या नागपूरमधील अशाच एका गणपती बाप्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा गणपती तीन हजार नारळांचा वापर करून बनविण्यात आला आहे. इको फ्रेंडली असलेली ही गणरायाची मूर्ती १२ फूट उंच आहे.
हिंदू पूजा विधीमध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना श्रद्धेने नारळ अर्पण केला जातो. नारळाचे महत्त्व समजून घेऊन इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा हा सुंदर प्रयत्न करण्यात आला आहे. इको फ्रेंडली गणपतीची संकल्पना पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी जपली जाते. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचता गणेशोत्सव साजरा केला जातो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

foodedge_49 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये “गणपती बाप्पा मोरया” लिहिलेय. या इको फ्रेंडली क्रिएटिव्हिटीचे युजर्सनी कौतुक केले आहे.

Story img Loader