जातिवाद, सामाजिक विषमता आणि आर्थिक वर्गवारी या गोष्टी भारतीयांसाठी नवीन नाही. जात-पात, धर्म, वर्ग किंवा व्यावसाय यावरुन आजही समाजामध्ये भेदभव दिसून येतो. सध्या हैद्राबादमध्ये या गोष्टीचा प्रत्यय आला. हैदराबादमधील एका सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर असलेली एक पाटी चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर ही पाटी खूप व्हायरल होत आहे. या पाटीवर कुठलीही जनहीतार्थ माहिती किंवा सूचना लिहली नसून यावर एक वादग्रस्त विधान लिहलं आहे. हे वाचून तुम्हालाही संताप येईल.
या पाटीवर लिहीले आहेत, “मोलकरीण, चालक किंवा डिलीव्हरी बॉइजनी जर मुख्य लिफ्ट वापरल्यास १००० रूपयांचा दंड आकारला जाईल.” पाटीवरील ही सुचना पाहिल्यावर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
खरं तर या पाटीवरून जनसामान्यातून रोष व्यक्त केला जातोय. मोलकर, चालक किंवा डिलीव्हरी बॉइज हे समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्यासोबत होत असलेला हा दुर्व्यवहार अशोभनीय आहे. जिथे एकिकडे आपण विकासाच्या दिशेने पावले टाकत आहोत मात्र दुसरीकडे अशा घटनेमुळे वैचारीक मानसिकतेत अधोगती दिसून येत आहे.
पाहा ही पाटी –
हेही वाचा >> मरिन ड्राइव्हवर मस्ती करणं तरुणाच्या अंगलट; मुंबई पोलिसांनी अशी घडवली अद्दल; VIDEO होतोय व्हायरल
नेटकऱ्यांनीही यावर टीका केली असून संतापजनक प्रतिक्रिया पोस्टवर केल्या आहेत. उच्चभ्रू वृत्तीचा निषेध असून असे वर्तन बंद करण्याचे आवाहन केले आहे. तर एकानं म्हंटलं आहे की, “जर ते पकडले गेले तर? तो गुन्हा आहे का? १००० दंड हा कदाचित त्यांच्या पगाराच्या २५% भाग आहे”