मुलांनो, जर तुम्हाला नोकरी नसेल तर कोणी मुलगी देईल का? चांगला पगार नसेल तर कोणी मुलगी देईल का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. ‘नोकरी नाही तर बाप तुम्हाला मुलगी देणार नाही’, हा डायलॉग तुम्ही जुन्या चित्रपटांमध्ये अनेकदा ऐकला असेल. ही गोष्ट वेगवेगळ्या चित्रपटांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलली गेली, पण सगळ्या संवादांचा सार एवढाच होता की, लग्न करण्यासाठी नोकरी असणे आवश्यक आहे. पण, हा संवाद फक्त चित्रपटांपुरता मर्यादित आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुमची चूक असेल. सोशल मीडियावर एक पोस्ट आली, ज्याने हे सिद्ध केले की लग्न करण्यापूर्वी मुलांसाठी नोकरी करणे खूप महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात नोकऱ्या मिळवणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीत अर्जदारांची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीत सर्वोत्तम व्यक्तीची निवड करण्यासाठी कंपनी त्यांची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी घेते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारालाच नोकरी मिळते. नोकरी मिळावी यासाठी बहुतांश जण मुलाखतीला जाताना वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण तयारी करतात. काही वेळा मुलाखतीच्या वेळी विचित्र किस्से घडल्याचंही आपण ऐकतो, वाचतो. सध्या असाच एक प्रकार खूप चर्चेत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय समोर आले?
एक्स युजर दिपाली बजाज (@dipalie_) या अर्वा हेल्थ नावाच्या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. नुकतेत त्यांनी त्याच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रत्यक्षात त्याच्या कंपनीतील नोकरीशी संबंधित फॉर्मचा आहे, जो उमेदवारांना अर्ज करताना भरावा लागतो. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे त्यांना लिहायची असतात. ही रिक्त जागा इंजिनिअरसाठी आहे. जेव्हा त्या तरणाला विचारण्यात आले की, “तुम्हाला असे का वाटते की तुम्ही या पदासाठी योग्य उमेदवार आहात,”? तेव्हा त्याने जे लिहिले ते खूपच मनोरंजक होते.
यावर उत्तर देताना त्या व्यक्तीने लिहिले, “मला वाटते की, या पदासाठी आवश्यक असलेली क्षमता माझ्याकडे आहे आणि हे कारणदेखील आहे की, जर मला ही नोकरी मिळाली नाही तर मी माझ्या बालपणीच्या प्रेमाशी कधीच लग्न करू शकणार नाही. कारण तिच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा मला नोकरी असेल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करू शकतो.” हे वाचून दीपालीलाही आश्चर्य वाटले.
व्हायरल स्क्रीनशॉट येथे पाहा
या उत्तराचा स्क्रीनशॉट दिपाली बजाज नावाच्या महिलेने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर @dipalie_ या तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यांनी इंजिनिअर पदासाठी काही जागा जाहीर केल्या होत्या. या व्यक्तीने या रिक्त पदासाठी अर्ज केला होता आणि असे उत्तर दिले होते जे आता व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “नोकरी द्या, कुणाला तरी त्याचे प्रेम मिळेल.” आणखी एका युजरने लिहिले, “त्याच्या प्रामाणिकपणासाठी त्याला नोकरी द्या.” तिसऱ्या युजरने लिहिले, “दोन प्रेमींना एकत्र करा आणि त्यांना नोकरी द्या.” अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.