देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी ते प्रेरणादायी, तर कधी मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. काही वेळा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून लोकांना सामाजिक समस्यांची जाणीव करून देत असतात, तर कधी जीवनासंबंधित चांगल्या वाईट गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर असा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. या फोटोमध्ये टायटॅनिक जहाज बुडताना दाखवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, जहाज पाण्यात बुडत असताना लोकही पाण्यात बुडाले, पण तरीही ते ज्याप्रकारे त्याचे मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करत आहेत, ते पाहून काळाच्या ओघात आपण मोबाइलचे गुलाम कसे बनत चाललो आहोत, हे या फोटोतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हा फोटो आजचा नाही तर २०१५ सालचा आहे.

आज टायटॅनिक बुडाले तर…

उद्योगपती आनंद महिंद्रा (@anandmahindra) यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, आज टायटॅनिक बुडाले असते तर… हा मीम पहिल्यांदा २०१५ मध्ये व्हायरल झाला होता. परंतु, प्रत्येक मावळत्या दिवसाबरोबर मीममधील फोटो अधिक प्रासंगिक वाटत असल्याचे दिसते.

महिंद्रांच्या या ट्विटला आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्ह्यूज, तर अनेकांनी त्यावर कमेंट करत आपले मत व्यक्त केले आहे. महिंद्रांनी पोस्ट केलेला फोटो हा एका कलाकाराने बनवला होता. फोटोमध्ये टायटॅनिक जहाज बुडताना दिसत आहे. तर पाण्यात पडलेले सर्व लोक आपले फोन काढून त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत.

डोईवर मुंडावळ्या अन्….; मुंबईच्या ट्रॅफिकला वैतागून नवरदेवासह वऱ्हाड निघालं मेट्रोने, पाहा लगीनघाईचा video

मोबाइलच्या नादात लोक बुडतायत स्वतःच

आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स म्हणाले की, लोक त्यांच्या फोनच्या नादात स्वत: बुडत आहेत. तर इतर युजर्सनी लिहिले की, प्रत्यक्षात आपण काळासोबत मोबाइलचे गुलाम होत आहोत, आपण विचार करणे आणि समजून घेणे बंद केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the titanic sank today anand mahindra post 2015 memes goes viral on social media sjr