सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण इंस्‍टाग्राम फीडमधून स्‍क्रोलिंग करत आपला दिवस सुरू करतो, मग ट्विटरवर जाऊन एखादी ट्विट लाईक किंवा रिट्विट करतो. मग फेसबूकवर जाऊन उगाच व्हिडिओ पाहतो आणि इतरांच्या आयुष्यात डोकावत सर्वांचे प्रोफाईल चाळत बसतो. सरतेशेवटी लिंक्डइनवर चक्कर मारतो आणि आणखी चांगल्या पगाराची नोकरी आहे का हे शोधतो. अशी हे सोशल मिडियामध्ये गुरफटलेलं आपलं आयुष्य. आपण वैयक्तिक आयुष्याची स्थिती काहीही असो पण सोशल मिडियावरील आपल्या आभासी जगातील प्रोफाईल, स्टेटस, फोटो या सर्व गोष्टी मात्र आपण नियमितपणे न चूकता करतो. हे सर्व आपल्यापुरतं मर्यादीत होतं तोपर्यंत ठिक होते पण आता वडापाव सुद्धा सोशल मिडियावर आपले खातं उघडले आहे. फक्त वडापावच नव्हे तर, डोसा, ढोकळा, चहा, राजमा चावल अशा काही लोकप्रिय खाद्यपदार्थांनी देखील आता सोशल मिडियावर जबरदस्त एन्ट्री मारली आहे.

लोकप्रिय खाद्यपदार्थांंचे जर लिंक्डइनवर खाते असते तर..?

प्रत्येक व्यावसायिक नोकरीच्या शोधात लिंक्डइनवर त्यांचे खाते सुरू करतो पण आता चक्क लोकप्रिय खाद्यपदार्थांंचे जर लिंक्डइनवर खाते असते तर ते कसे असले असते? तुम्ही कदाचित अशी कल्पना देखील केली नसेल पण स्विगी इंडियाने इंस्टाग्रामवर अशीच काहीशी कल्पना गृहित धरून मजेशीर पद्धतीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये माणसांची नव्हे तर चक्क लोकप्रिय खाद्यपदार्थांचे लिंक्डइनवरील काल्पनिक खाती तयार केली आहेत. विनोदी आणि उपहासात्मक कल्पना करुन तयार केलेले फोटो सध्या सर्वत्र चांगलेच चर्चेत आहे. अतिशय प्रभावीपणे खाद्यपदार्थांचे काल्पनिक लिंक्डइन खाते तयार करुन सध्या सर्व नेटकऱ्यांचे नेटिझन्सचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात स्विगीला नक्की यश मिळाले आहे.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

वडापाव जर लिंक्डइनवर आला तर?

Swiggy ने लोकप्रिय खाद्यपदार्थांचे काल्पनिक लिंक्डइन खाते असते तर कसे असले असते याची एक झलक दाखवली आहे. यामध्ये सर्वात आधी वडा पाव होता, ज्याला ते मुंबईचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हटले असून त्याला एक वरिष्ठ स्ट्रीट फूड स्पेशालिस्ट असे पद देण्यात आले आहे ज्याला फक्त ‘मसालेदार चटपटीत’ गप्पा मारायला आवडतात.

हेही वाचा : Viral Video: आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा! याचं इंग्रजी एकुन पोट धरून हसाल

त्यांनतरचा खाद्यपदार्थ आहे डोसा, ज्याला गेली तीन वर्षे सलग ‘बेस्ट ब्रेकफास्ट क्लासिक’ पुरस्कार मिळाला. दरम्यान, ढोकळा हा पाहुण्यांना देण्यासाठी आवडता स्नॅक्स म्हटले जात आहे, तर राजमा चावल हा कम्फर्ट फूडचा सीईओ असल्याचे म्हटले जात आहे. क्रोइसेंट्स आणि पास्ता यांच्यासाठीही अशाच मजेदार कल्पना करून लिंक्डइन खाते उघडले आहे.

या पोस्टच्या अगदी शेवटच्या फोटोमध्येमध्ये स्विगी खात्याच्या अ‍ॅडमिनच्या नावाचे काल्पनिक लिंक्डइनवरील खाते दिसत होते, जो सार्वजनिकपणे पगार वाढविण्याची मागणी करत होता. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘माझी पगार वाढ या पोस्टला 10 हजार लाईक्स मिळण्यावर अवलंबून आहे.’ असेही लिहले होते.

हेही वाचा – समोसा विकून IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करतोय ‘हा’ दिव्यांग तरुण, Video पाहून तुम्हीही त्याच्या जिद्दीचं कौतुक कराल

खाद्यपदार्थांचे काल्पनिक लिंक्डइन खाते पाहून नेटकरी झाले थक्क


Swiggy Indiaची ही जरी एक मार्केटिंग स्टॅटर्जी असली तरी पोस्टने नेटकऱ्यांना थक्क करून सोडले आहे. त्याला आतापर्यंत तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. इतकंच नाही तर अनेकांनी अ‍ॅडमिनच्या पगारवाढीबाबतही चर्चा केली आहे. एकाने लिहिले की, ‘स्विगी इंडियाचे हे पेज हाताळणाऱ्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडलो आहे. अगदी अधिकृत लिंक्डइन खात्यावरून ‘लीडर ऑफ टुडे, लंच मेन्यू ऑफ टूमोरो’ अशी टिप्पणी केली आहे.

काहींनी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचे असेच काल्पनिक लिंक्डइन खाते उघडण्यासाठी विनंती केली. “बटर चिकन कुठे आहे,” अशी मागणी एकाने केली. “मला वैयक्तिकरित्या डोसाचा चटणी आणि सांबारचे काल्पनिक खाते आवडले,” असे आणखी एकाने म्हटले. इतर काहींनी अशा विनोदी पोस्ट्स तयार करण्यासाठी अ‍ॅडमिनला पगारवाढ देण्याची विनंती केली. “अ‍ॅडमिनला पगारवाढ द्या अशी कमेंट एकाने केली आहे.

स्विगीच्या विचित्र पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटले? आम्हाला नक्की कळवा.

Story img Loader