सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण इंस्टाग्राम फीडमधून स्क्रोलिंग करत आपला दिवस सुरू करतो, मग ट्विटरवर जाऊन एखादी ट्विट लाईक किंवा रिट्विट करतो. मग फेसबूकवर जाऊन उगाच व्हिडिओ पाहतो आणि इतरांच्या आयुष्यात डोकावत सर्वांचे प्रोफाईल चाळत बसतो. सरतेशेवटी लिंक्डइनवर चक्कर मारतो आणि आणखी चांगल्या पगाराची नोकरी आहे का हे शोधतो. अशी हे सोशल मिडियामध्ये गुरफटलेलं आपलं आयुष्य. आपण वैयक्तिक आयुष्याची स्थिती काहीही असो पण सोशल मिडियावरील आपल्या आभासी जगातील प्रोफाईल, स्टेटस, फोटो या सर्व गोष्टी मात्र आपण नियमितपणे न चूकता करतो. हे सर्व आपल्यापुरतं मर्यादीत होतं तोपर्यंत ठिक होते पण आता वडापाव सुद्धा सोशल मिडियावर आपले खातं उघडले आहे. फक्त वडापावच नव्हे तर, डोसा, ढोकळा, चहा, राजमा चावल अशा काही लोकप्रिय खाद्यपदार्थांनी देखील आता सोशल मिडियावर जबरदस्त एन्ट्री मारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा